ETV Bharat / bharat

Goa Assembly Elections 2022 : काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा होताच देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल - गोवा विधानसभेची निवडणूक

काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची घोषणा केली आहे. ( Devendra Fadnavis Goa in charge) त्यानंतर राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस गुरुवारी मध्यरात्री तातडीने गोव्यात दाखल झाले आहेत. (Goa Assembly Elections 2022) ते राज्यातील सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत.

गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस
गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 17, 2021, 10:33 AM IST

गोवा (पणजी)- काल काँग्रेस पक्षाने आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी घोषीत केली.(Goa Assembly Congress List) राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ( Devendra Fadnavis Goa in charge) राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस गुरुवारी मध्यरात्री गोव्यात दाखल झाले आहेत.

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस

काँग्रेसचे महासचिव आणि केंद्रीय निवडणूक समितीचे प्रभारी मुकुल वासनिक यांनी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची घोषणा केली आहे. तलिगावमधून टोनी रोड्रिग्स, पोंडा येथून राजेश वेरेनकर, मर्मुगावमधून संकल्प अमोनकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. कर्टोरिम येथून एलिक्सो रेजिनाल्डो लारेन्सो ( Aleixo Reginaldo Lourenco from The Curtorim Seat) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाही तिकीट

काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी 2012 ते 2017 दरम्यान मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते गोवा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत. मरगावमधून दिगंबर कामत ( Digamber Kamat from the Margao constituency ) आणि कुनकोलिममधून यूरी अलीवामो ( Sudhir Kanolkar from the Mapusa assembly seat ) हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसच्या पहिल्या यादीत मापुसा विधानसभा क्षेत्राचे सुधीर कानोलकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

लैंगिक शोषणाचे आरोपारून राजकीय वातावरण तापले

काँग्रेसच्या पहिली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर भाजपच्या अंतर्गत गोटातही जोरदार राजकीय खलबते सुरू झाली आहे. रात्री अचानक उशिरा राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस गोव्यात दाखल झाले आहेत. आगामी दोन दिवसांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात मंत्री मिलिंद नाईक यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोपारून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी भाजपला यावरून टार्गेट केले आहे.

पेट्रोलचे दर यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापले आहे

भाजपच्या कुट्ठली येथील आमदार एलिना सलढणा यांनी राजीनामा दिला आहे. ही राजकीय परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. तसेच, रोजगार, पेट्रोलचे दर यावरून मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापले आहे. म्हणूनच ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची राजकीय नाचक्की टाळण्यासाठी फडणवीस गोव्यात दोन दिवसांचा दौरा करणार आहेत.

हेही वाचा - ...तेव्हा त्याचा आनंद घ्या, कर्नाटकचे आमदार रमेश कुमार यांचे असभ्य वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.