ETV Bharat / bharat

टीएमसीचं 'मिशन गुजरात' : आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार!

गुजरातमध्ये आम आदमी पार्टीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या प्रवेशामुळे पुढच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका रंगतदार होणार, असे दिसते.

TMC
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Jul 22, 2021, 10:40 AM IST

अहमदाबाद - पुढील वर्षात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून राजकीय वातावरण गरम होत चालले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रणशिंग फुंकलं आहे. गुजरातमध्ये बसपा, एआयएमआयएम आणि आम आदमी पार्टी (आप) च्या प्रवेशानंतर आता ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी) देखील गुजरातमध्ये एन्ट्री करणार आहे. बंगालबाहेर भाजपाला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे आगामी वर्षीच्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका रंगतदार होणार, असे दिसते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 21 जुलै रोजी शहीद दिनाला संबोधित केले. त्यांच्या भाषणाचे प्रसारण देशभरात करण्यात आले होते. गुजरातमध्येही ममतांच्या भाषणासाठी एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या होत्या. दीदींचे होर्डिंग्ज पक्षाने अहमदाबाद, सूरत आणि वडोदरा येथे लावली होती. मात्र, काही ठिकाणी ती हटवण्यात आली होती. ममता बॅनर्जीं राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी तयार आहेत. याची सुरवात त्या गुजरातपासून करणार असल्याचे बोलले जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

2022 साली होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर (182 जागांवर) आम आदमी पक्षाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहेत. तर ममता बॅनर्जीही आपले उमदेवार रिंगणात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

2022 मध्ये सहा राज्यात निवडणुका -

पुढील वर्षी गुजरातसहीत उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये निवडणूक होत आहेत. आतापर्यंत गुजरातच्या राजकारणात फक्त काँग्रेस आणि भाजपा हेच दोन पर्याय असल्याचे दिसत होते. मात्र, आता परिस्थिती बदलत असून गुजरातच्या नागरिकांना आप, बसपा, टीएमसी हे पर्याय मिळणार आहेत.

हेही वाचा - 'भाजपाला सत्तेबाहेर हाकलत नाही, तोपर्यंत 'खेला' होणार'; ममतांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.