ETV Bharat / bharat

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावतांचा राजीनामा

author img

By

Published : Jul 3, 2021, 3:35 AM IST

तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवार रात्री 11 वाजून 16 मिनिटाला पर राज्यपाल बेबी रानी मौर्य यांच्याकडे राजीनामा सोपवला.

तीरथ सिंह रावत
तीरथ सिंह रावत

डेहराडून - तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवार रात्री 11 वाजून 16 मिनिटाला पर राज्यपाल बेबी रानी मौर्य यांच्याकडे राजीनामा सोपवला. राज्यपालांकडे राजीनामा सोपविल्यानंतर तीरथ सिंह रावत म्हणाले, कोरोनाबाधित असल्यामुळे सल्टमधील पोटनिवडणुकीत सहभागी होणे शक्य झाले नाही. त्यामुळे निवडणुकीच्या संवैधानिक पेचातून राजीनामा दिला आहे. त्यानंतर पक्षाचे आभार मानले. तीरथ सिंह रावत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले. तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा देतेवेळी त्यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष मदन कौशिक, मंत्री बिशन सिंह चुफाल,अरविंद पांडे, गणेश जोशी यांच्यासह अनेक आमदार होते.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावतांचा राजीनामा

दिवसभरातील संपूर्ण घटनाक्रम -

मागील तीन दिवसांपासून तीरथ सिंह रावत दिल्लीमध्ये होते. शुक्रवारी त्यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. शुक्रवारी रात्री तीरथ सिंह रावत दिल्लीहून डेहराहूनला परतले. त्यानंतर ते थेट सचिवालयात गेले. सचिवालयातील कामकाज आटपवून पत्रकार परिषदेला संबोधित केले. मात्र त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली नाही. त्यानंतर राजभवनात पोहोचले आणि रात्री अकरा वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.