लखीमपूर खेरी (उत्तरप्रदेश) : Tiger Attack: जिल्ह्यात वाघांचे हल्ले सातत्याने वाढत Tiger Attack in Lakhimpur Kheri आहेत. गुरुवारी पाणवठ्याजवळ असलेल्या एका चौकीदाराचा वाघाने बळी Watchman Died in Tiger Attack घेतला. गोला परिसरात गेल्या सहा दिवसांत वाघाच्या हल्ल्यात झालेला हा चौथा मृत्यू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डीएफओ दक्षिण खेरी संजय बिस्वाल यांनी सांगितले की, घटना वेगळ्या पद्धतीने घडत आहेत. आम्ही तीन दिवसांपासून परिसरात तळ ठोकून आहोत. लोकांना उसाच्या शेतात आणि जंगलात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिणपुरी वनविभागाच्या गोला रेंजमधील अलीगंज रोडवरील जामुनाबाद फार्मजवळ बजाज शुगर मिल्स फार्म आहे. इथे हिरालाल नावाचा चौकीदार शेतावर पहारा देत असे. गुरुवारी सकाळी हिरालाल यांचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. तपासणीत तेथे वाघाचे ठसे आढळून आले. वाघाने पहारेकरी हिरालाल यांना उसाच्या शेतात ओढून नेले आणि खाल्ले. हिरालाल यांचे निधन झाले. माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाचे पथक सकाळी घटनास्थळी पोहोचले. रेंजर संजीव तिवारी यांनी सांगितले की, वाघाचा हल्ला होण्याची शक्यता आहे. आम्ही तपास करत आहोत.
डीएफओ दक्षिण संजय बिस्वास यांनी गोला परिसरातील नागरिकांना जंगलात न जाण्याचा इशारा दिला आहे. जर तुम्ही जंगलाभोवतीच्या शेतात पहारा देण्यासाठी गेलात तर एकटे राहू नका. ऊसाच्या शेतात जरी गेलात तरी आवाज करून जा किंवा गटागटाने जा. डीएफओ संजय बिस्वास यांनी सांगितले की, परिसरात वन पथके तैनात करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडत आहेत. त्यांची टीम लोकांना जागरूक करत आहे. त्याचवेळी वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. वनविभागावरही दबाव वाढत आहे.