ETV Bharat / bharat

Ramdas Athawale on Tibet issue : चीनच्या 'त्या' पत्रावर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Chinese Letter India On Tibet

तिबेट कार्यक्रमासंदर्भात चीनने पाठवलेल्या पत्रावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील ( Ramdas Athawale on Tibet issue ) प्रतिक्रिया दिली. तिबेटचा प्रश्न सुटलाच पाहिजे, असे ते म्हणाले.

Ramdas Athawale
रामदास आठवले
author img

By

Published : Jan 1, 2022, 4:26 PM IST

Updated : Jan 1, 2022, 6:06 PM IST

हैदराबाद - तिबेटशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल चिनी दूतावासाने भारतीय संसद सदस्यांना संतप्त पत्र पाठवले आहे. या पत्रात चीनने तिबेटचा अविभाज्य भाग म्हणून वर्णन केले आहे आणि तिबेटच्या निर्वासित सरकारला बेकायदेशीर संघटना म्हणून वर्णन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले बिजू जनता दलाचे राज्यसभा खासदार सुजित कुमार यांनी चीनच्या या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. चीनच्या पत्रावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील ( Ramdas Athawale on Tibet issue ) प्रतिक्रिया दिली.

चीनला काही आक्षेप असतील. पण तिबेटचा प्रश्न सुटलाच पाहिजे असे मला वाटते. दलाई लामा 1949 मध्ये भारतात आले त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तिबेटच्या लोकांना त्रास होऊ नये. चीनच्या पत्राला आमचे परराष्ट्र व्यवहार मंत्री उत्तर देतील, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

तिबेटमधील निर्वासित सरकारच्या वतीने चीनच्या या कृतीचा निषेध करणारे निवेदनही जारी करण्यात आले आहे. 21 डिसेंबर रोजी, भारतीय संसद सदस्यांचा एक गट दिल्लीतील इम्पीरियल हॉटेलमध्ये आयोजित डिनर रिसेप्शनमध्ये सहभागी झाला होता. ऑल पार्टीज इंडियन पार्लियामेंट फोरम फॉर तिबेट मंच सक्रिय करण्यात आला. सुजित कुमार यांना त्याचे निमंत्रक बनवण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि खासदार मेनका गांधीही उपस्थित होत्या.

हेही वाचा - Solapur Blind Artist : अंधत्व असतानाही शेतात चितारले हे अनोखे चित्र अन् केले नव्या वर्षाचे स्वागत

Last Updated : Jan 1, 2022, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.