सौसर (मध्यप्रदेश) - सौसर-छिंदवाड़ा मार्गावर एर्टिगा कार सुरक्षा कठड्यावर आदळून अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना काल (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात एर्टिगा गाडीचे दोन तुकडे झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रामाकोना गावाकडून एर्टिगा गाडी सौसर शहराकडे जात होती. ही गाडी छिंदवाडा मार्गावरील सौसर ड्रीमलँड सिटीजवळ सुरक्षा कठड्याला आदळली. या दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लोकांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत पावलेल्या तीन महिला या सौंसरच्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचे दोन तुकडे झाले.
हेही वाचा - टीएमसी प्रवेशानंतर मुकुल रॉय यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...'भाजपात कोणीही राहणार नाही'