-
#WATCH | Members of the Judicial Commission recreate the crime scene of the killing of gangster brothers Atiq Ahmad and Ashraf in UP's Prayagraj on April 15, as part of the ongoing investigation. pic.twitter.com/vVoaSWVaOZ
— ANI (@ANI) April 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Members of the Judicial Commission recreate the crime scene of the killing of gangster brothers Atiq Ahmad and Ashraf in UP's Prayagraj on April 15, as part of the ongoing investigation. pic.twitter.com/vVoaSWVaOZ
— ANI (@ANI) April 20, 2023#WATCH | Members of the Judicial Commission recreate the crime scene of the killing of gangster brothers Atiq Ahmad and Ashraf in UP's Prayagraj on April 15, as part of the ongoing investigation. pic.twitter.com/vVoaSWVaOZ
— ANI (@ANI) April 20, 2023
प्रयागराज (उत्तरप्रदेश): माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी गुरुवारी तीन पथके दाखल झाली. न्यायिक तपास पथक, एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि माहिती गोळा केली. तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशी पथक सर्किट हाऊसवर पोहोचले. यानंतर पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेण्यात आली. तेथे एसआयटीने कोल्विन हॉस्पिटल गाठले. याशिवाय फॉरेन्सिक टीमने हत्या झालेल्या ठिकाणी पोहोचून माहिती गोळा केली.
न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना: शनिवारी, १५ एप्रिल रोजी पोलीस कोठडीत वैद्यकीय तपासणीसाठी जात असलेला माफिया अतिक आणि त्याचा भाऊ खालिद अझीम उर्फ अश्रफ यांची रुग्णालयाच्या आवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांना अटक केली होती. या हत्याकांडानंतर लखनऊमध्ये सीएम योगी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यानंतर पोलीस कोठडीतील हत्येचा तपास करण्यासाठी न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती.
चौकशी समिती सक्रिय, अहवाल सादर करणार: चौकशीनंतर आयोग सरकारला अहवाल सादर करेल. या पथकातील सदस्य गुरुवारी सर्किट हाऊसवर पोहोचले. यानंतर घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. आरोपींचीही चौकशी करण्यात आली. या पथकाने अधिकाऱ्यांना आतापर्यंत केलेल्या तपासाचा बिंदूनिहाय तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले. निवृत्त न्यायमूर्ती अरविंद कुमार त्रिपाठी, माजी डीजी सुभेश सिंह, माजी न्यायाधीश ब्रिजेश कुमार न्यायिक चौकशी आयोगाच्या टीममध्ये आहेत. टीमने एसआयटी सदस्यांसोबत बैठकही घेतली.
एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमही पोहोचली : दुसरीकडे एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमही तपासासाठी पोहोचली. फॉरेन्सिक टीममध्ये सहा सदस्यांचा समावेश होता. तपास पथके आल्याने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था चोख राहिली. तिन्ही पथकांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली. रुग्णालयाच्या आतील स्थितीही पाहिली. घटनेशी संबंधित प्रत्येक मुद्द्याची माहिती घेतली. अतिक आणि अश्रफ यांची रुग्णालयाच्या परिसरात कॅमेऱ्यासमोर हत्या करण्यात आल्यानंतर या हत्याकांडाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.