श्रीनगर ( जम्मू-काश्मीर ) : बुधवारी 11 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील माचल सेक्टरच्या फॉरवर्ड भागात जवान नियमित गस्त घालताना रस्त्यावर असलेल्या बर्फामुळे त्यांची गाडी घसरली आणि ती खोल दरीत ( snow on road caused car to collapse ) पडली. या दुर्घटनेनंतर जवानांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ट्विट करत म्हटले ( three solider died in Machal Sector ) आहे.
तीन जवानांचा मृत्यू : शहीद झालेल्या सैनिकांमध्ये एक जेसीओ आणि इतर दोन जवानांचा समावेश आहे. 10 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता माचल सेक्टरमध्ये फॉरवर्ड पोस्टकडे जात असताना ही घटना ( three solider died in Kupwada ) घडली. अपघाताची माहिती मिळताच जवळच्या चौकीतून त्यांची शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली. प्रतिकूल हवामान आणि खडबडीत भूभाग यामुळे शोध मोहिमेत सतत अडथळा येत होता. अखेर आज पहाटे 04:15 ते 04:45 च्या दरम्यान तीन शूर सैनिकांचे पार्थिव बाहेर काढण्यात यश आले.
जवानांची माहिती : परशोतम कुमार, अमरिक सिंग, अमित शर्मा अशी त्यांची नावे आहेत. एनबी सबब परशोतम कुमार त्रेचाळीस वर्षांचे होते आणि ते 1996 मध्ये सैन्यात भरती झाले होते. ते जम्मू-काश्मीरमधील मजुआ उत्तमी, पोस्ट रायका, तहसील, बिश्नाह, जिल्हा जम्मू येथील होते. एनबी सबब परशोतम कुमार यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. अमरिक सिंग हे एकोणतीस वर्षांचे होते. 2001 मध्ये सैन्यात भरती झाले होते. ते हिमाचल प्रदेशातील मंदवारा, पोस्ट मारवाडी, तहसील घनारी, जिल्हा उना येथील होते. वीरच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : शहिद अमित शर्मा हे तेवीस वर्षांचे होते. ते 2019 मध्ये सैन्यात दाखल झाले होते. ते हिमाचल प्रदेशातील तलासी खुर्द, पोस्ट किरविन, तहसील हमीरपूर, जिल्हा हमीरपूर या गावचे होते. त्यांच्यापश्चात त्यांची आई आहे. तिन्ही शहीदांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटूंबीयांकडे नेले जातील. तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात ( military funeral ) येतील.