निर्मल: अधिक मौनिका, सिब्बुला मौनिका आणि कुंता मौनिका (THREE GIRLS WITH THE SAME NAME) निर्मल जिल्ह्यातील लोकेश्वरम झोनमधील होडगाम, लोकेश्वरम, राजुरा या गावांमध्ये राहतात. शारदा विद्यामंदिर (२०१२-१३) या शाळेतच त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण (WENT TO THE SAME SCHOOL) घेतले होते. एसएससीनंतर तिन्ही मुलींनी त्यांचा कृषी पदविका अभ्यासक्रम (2014-2016) वेगवेगळ्या संस्थांत पूर्ण केला. एम. मौनिकाने रुद्रूर येथील सी-टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेतले, एस मौनिकाने मेडक येथील डिप्लोमा अॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये आणि जे. मौनिकाने मेडक येथील डॉ. रामनायडू कृषी डिप्लोमा कॉलेजमध्ये डिप्लोमा पूर्ण केला.
नंतर त्यांनी तेलंगणा राज्य सरकारी क्षेत्रातील कृषी पदांसाठी अर्ज केला आणि परीक्षेला बसल्या. या तीघी परीक्षेत निवडल्या गेल्या आणि त्यांना निर्मल जिल्ह्यातील गडचंदा क्लस्टर लोकेश्वरम झोनमध्ये नोकरी मिळाली. त्या तीघी कृषी विस्तार अधिकारी म्हणून एकाच ठिकाणी म्हणजेच गचंदा क्लस्टरमध्ये एकत्रत्र नोकरी करत आहेत.
एकाच शाळेत शिकणे.. एकाच परीक्षेला बसणे.. समान नोकरी आणि एकाच कार्यालयात एकाच ठिकाणी मिळणे हे यांच्या बाबतीत नाविण्यपुर्ण आणि मनोरंजक आहे. या बद्दल त्या स्व:ताला खुप भाग्यवान मानतात. आणि एकत्र काम करताना त्या आनंदी असतात.
"मला वाटते की मी माझ्या लहानपणीच्या मित्रांसोबत मला काम करायला मिळतेय आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्ही एकाच शाळेत शिकलो होतो. आता आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो. आमची नावे सारखीच आहेत.. त्यामुळे जेव्हा लोक आमच्या ऑफिसमध्ये येतात तेव्हा त्यांचा आमच्या नावांबद्दल गोंधळ होतो. आमची शाळा देखील आमच्या ऑफिसच्या जवळ आहे. आम्हाला आमचे शाळेचे दिवस आठवतात. आम्ही आमच्या शाळेला भेट देतो आणि शिक्षकांशी बोलतो. त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिली.