ETV Bharat / bharat

पाकिस्तान विजयाच्या घोषणा दिल्याने तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल - विद्यार्थ्यांना कॉलेजमधून निलंबित

महाविद्यालयीन कार्यक्रमा दरम्यान 3 अभियांत्रिकी विद्यार्थी पाकिस्तान समर्थक घोषणा देत व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने तक्रार दिली आणि विद्यार्थ्यांना कॉलेजमधून निलंबित करण्यात आले आहे.

Three engineering students
Three engineering students
author img

By

Published : Nov 19, 2022, 1:34 PM IST

बेंगळुरू: महाविद्यालयीन कार्यक्रमा दरम्यान 3 अभियांत्रिकी विद्यार्थी पाकिस्तान समर्थक घोषणा देत व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर कॉलेज प्रशासनाने तक्रार दिली आणि विद्यार्थ्यांना कॉलेजमधून निलंबित केले.

विद्यार्थ्यांची ओळख पटली: 2 विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली, तर दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. त्यानंतर हा व्हिडिओ त्यांच्या मित्रांमध्ये शेअर करण्यात आला आणि व्हायरल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक मुलगी आणि दोन मुले अशी घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. एका मुलीने आणि एका मुलाने पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्या आणि एका मुलाने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ केला आहे.

तरुणांकडून मारहाण: व्हिडीओ पाहणाऱ्या तरुणांकडून विद्यार्थ्यांची चौकशीही करण्यात आली. त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या मुलाला मारहाण केली, त्याला माफी मागायला लावली आणि कर्नाटक आणि कन्नड समर्थक घोषणा दिल्या. माफी मागताना मुलाने स्पष्ट केले की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मराठहळ्ळी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे व्हाईटफिल्ड विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

स्टेशनवर जामिनावर सुटका: महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या सांस्कृतिक महोत्सवादरम्यान ही घटना घडली. हे सर्व इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. मोबाईलच्या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक मुलगी घोषणा देत आहे. आणि दोन मुले मागून आवाज जोडताना दिसत आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांनी घोषणा दिल्या आणि गंमत म्हणून रेकॉर्ड केले आणि त्यामागे कोणताही हेतू नाही. तिघांवर IPC 153 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही अटक करून पोलीस अधिकाऱ्याने जामिनावर सोडले. ही संवेदनशील बाब आहे, त्यामुळे आम्ही विद्यार्थी आणि महाविद्यालयाची नावे नमूद केलेली नाहीत आणि एक मुलगा अल्पवयीन आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.