ETV Bharat / bharat

UP Raod Accident: डंपरची दुचाकीला जोरदार धडक; काका-पुतण्यासह तिघांचा मृत्यू - रस्ता अपघाताची माहिती

सीतापूर येथे रविवारी रात्री उशिरा एक रस्ता अपघात झाला. सिधौली कोतवाल आरके सिंह यांनी सांगितले की, तीन जणांचा या अपघातात मृत्यू झाला.

Raod Accident
डंपरची दुचाकीला जोरदार धडक
author img

By

Published : Feb 13, 2023, 9:04 AM IST

सीतापूर : जिल्ह्यातील सिधौली कोतवाली परिसरात एका लग्न समारंभावरून परतणाऱ्या दुचाकीस्वार काका-पुतण्यासह तिघांना भरधाव वेगात आलेल्या डंपरने धडक दिली. यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतांना सीएचसी सिधौली येथे नेले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सिधौली कोतवाल आरके सिंह यांनी सांगितले की, अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

दुचाकीस्वारांना धडक : आनंद गुप्ता यांचा मुलगा अजय कुमार गुप्ता, त्यांचे काका हनुमान प्रसाद यांचा मुलगा दयाल राहणार मांढिया पोलीस स्टेशन रामपूर काला आणि जितेंद्र पाल यांचा मुलगा महेश्वर दयाल राहणार बख्तावरपूर पोलीस स्टेशन सिधौली यांच्यासह शहरातील सैनी लॉन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. लग्न समारंभआटोपून घरी परतत असताना शहरातील बिस्वा मार्गावर जयश्री हॉस्पिटलजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात डंपरने तीन दुचाकीस्वारांना धडक दिली. यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला.

रस्ता अपघाताची माहिती : सीतापूर येथील रस्ता अपघाताची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांना सीएचसी सिधौली येथे नेले. जिथे डॉक्टरांनीही सर्वांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. माहिती मिळताच सीओ सिधौली यादवेंद्र यादव, कोतवाली प्रभारी आरके सिंग, कसबा चौकी प्रभारी उमेश चौरसिया, उपनिरीक्षक राजेश राय, माणिकराम वर्मा, संजीव सिंग यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा सीएचसीमध्ये पोहोचला.

अज्ञात वाहनाचा शोध सुरू : या प्रकरणी सिधौली कोतवाल आरके सिंह यांच्याशी त्यांच्या सीयूजी क्रमांकावर बोलले असता त्यांनी सांगितले की, बुलेटवर बसून ३ जण लग्न समारंभातून परतत होते. त्यांना मागून ट्रक किंवा डंपरने धडक दिली. यामुळे तिघेही तेथे पडले. माहिती मिळताच पोलिस ताफ्यासह घटनास्थळी गेले. जखमींना सीएससी सिधौली येथे नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.

बुलढाणा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर तालसवाडा नजीक पुलावर ट्रक व मेटाडोर समोरासमोर भिषण धडक झाली होती. ही धडक एवढी भिषण होती की, या धडकेत मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील 3 जण जागीच ठार झाले होते. तर 1 जण गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर बुलढाणा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. यातील जखमींना तत्काळ मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ही घटना 12 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली होती.

हेही वाचा : Accident : बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर अपघात, तीनजण ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.