ETV Bharat / bharat

Jammu Kashmir : घरात कोणीच नव्हते डॉक्टर; जम्मू काश्मीरच्या तीन बहिणींनी नीटमध्ये फडकावला झेंडा

author img

By

Published : Jun 16, 2023, 8:56 AM IST

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नीट ( NEET ) परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे. या परीक्षेत जम्मू काश्मीरच्या एकाच घरातील तीन बहिणींनी यश मिळवले आहे. तीन बहिणींनी नीट परीक्षेत यश मिळवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Jammu Kashmir
कुटूंबासह नीट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनी

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दुर्गम भागात डॉक्टर सेवा देण्यास तयार होत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होतात. नेहमी दहशतवादामुळे लष्करी कारवाया सुरू असल्याने त्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि शिक्षणावर होते. मात्र आता जम्मू काश्मीरमध्ये विकासाची पहाट होत आहे. त्याच्याच प्रत्यय नागरिकांना येत आहे. जम्मू काश्मीरमधील एकाच घरातील तीन बहिणींनी नीट ( NEET ) परीक्षेत यश मिळवल्याने त्यांचे कौतुक होत आहे. या तीन चुलत बहिणींनी सोबतच अभ्यास करुन हे यश मिळवले आहे. नौशेरा येथील तुबा बशीर, रुतबा बशीर आणि अर्बिश अशी या तीन बहिणींची नावे आहेत.

  • Jammu & Kashmir: Three cousin sisters, Tuba Bashir, Rutba Bashir and Arbish from Nowshera in Srinagar cleared the NEET exam (15.06)

    Tuba Basheer said, "I feel great that all three of us have cleared NEET together because we went to school and coaching together & we thought we… pic.twitter.com/o4l6jw0Lb5

    — ANI (@ANI) June 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

घरात कोणीच नव्हते डॉक्टर : नौशेरा येथील बशीर कुटुंबात कोणीच डॉक्टर नव्हते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कोणी यश मिळवेल, याची शक्यता कमीच होती. मात्र या कुटूंबातील तीन बहिणींनी डॉक्टर होण्याचा निर्धार केला. कोणत्याही सुविधा नसताना या तिघींनीही मोठ्या कष्टाने नीट परीक्षा दिली. या परीक्षेत तिघी बहिणी चांगल्या गुणांनी पास झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

तिघी बहिणींनी एकत्रच केला अभ्यास : या तिघी बहिणींनी नीटचा अभ्यास सोबतच केला. याबाबत बोलताना तुबा बशीर म्हणाली मला खूप छान वाटत की आम्ही तिघांनी मिळून NEET उत्तीर्ण केली. आम्ही शाळेत सोबतचे जात होतो, त्यासह आम्ही कोचिंग क्लासलाही एकत्र गेलो. आम्हाला वाटले की आम्ही MBBS पास करून डॉक्टर होऊ. मी खूप आनंदी असून मी खूप मेहनत केली आणि त्याचे फळ मिळाल्याचे तुबा बशीरने सांगितले.

यशाचे श्रेय आमच्या पालकांना : जम्मू काश्मीरसारख्या दुर्गम परिसरात शिक्षणासाठी बऱ्याच अडचणी येतात. मात्र त्या अडचणींवर मात करत या तिघी बहिणींनी यश संपादन केले आहे. याबाबत आम्ही खूप आनंदी असून आम्ही 11 वीपासूनच NEET परीक्षेची तयारी सुरू केली. आम्ही खूप सराव केला आहे. आमच्या यशाचे श्रेय आमच्या पालकांना जाते, त्यांनी आम्हाला लहानपणापासून पाठिंबा दिल्याचे रुतबा बशीरने स्पष्ट केले.

कुटुंबात डॉक्टर नसल्याने केला निर्धार : बशीर कुटूंबात कोणीही डॉक्टर नसल्याने या मुलींनी डॉक्टर होण्याचे ध्येय बाळगले. इतकेच नाही, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कष्टही घेतले. त्यामुळेच एकाच घरातील तीन मुली नीट परीक्षा पास करु शकल्या. याबाबत मला खूप आनंद वाटत आहे. आमच्या कुटुंबात डॉक्टर नव्हते, त्यामुळे डॉक्टर व्हायचे हा माझा स्वतःचा निर्णय होता. आमच्या पालकांनी सुरुवातीपासूनच आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. तयारी करताना लक्षात ठेवावे लागले की हा पहिला आणि शेवटचा प्रयत्न आहे. या निर्धाराने चालायचे असून अभ्यास करत राहायचे. त्यामुळे तसा प्रयत्न केला आणि यश मिळाल्याचे उर्बिशने यावेळी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.