जशपूर - छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील बतोली येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या बहिणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आली होती. त्यानंतर तिच्यावर चौघांनी बलात्कार केला. या बलात्काराच्या घटनेत पीडितेच्या प्रियकराचाही समावेश होता. त्यानेच आपल्या मित्रांसोबत मिळून हा सामूहिक अत्याचार केला.
बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला बेशुद्ध अवस्थेत घटनास्थळीच सोडून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी सध्या फरार आहे. अजित किस्पोट्टा, रविकांत एक्का आणि संदीप एक्का अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आरोपी आनंद असे फरार आरोपीचे नाव आहे.
बोलेरोत बसवून गावाबाहेर नेत अत्याचार-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरगुजा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलगी बहिणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. कार्यक्रम संपल्यानंतर ती जेवायला जात असताना तिचा प्रियकर त्याच्या तीन दोस्तासह कार्यक्रमस्थळी पोहोचला. त्यानंतर सर्वांनी मिळून तिला बोलेरो जीपमध्ये बसवून गावाबाहेर घेऊन गेले. त्यानंतर त्या चौघांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
बेशुद्ध अवस्थेत दिले फेकून -
घटनेनंतर नराधम आरोपींनी पीडितेस बेशुद्ध अवस्थेत घटनास्थळीच फेकून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर सकाळी पीडितेच्या पालकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. बतोली आणि बगीचा पोलिसांनी संयुक्त अभियान राबवून तीन आरोपींना अटक केली आहे. यासाठी मोबाईल लोकेशच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. तर एक आरोपी अद्याप फरार आहे.