किव्ह - रशियाने युक्रेनमध्ये पहिल्यांदाच आपल्या नवीन किंजेल हायपरसॉनिक मिसाईलचा (Kinzel Hypersonic Missile) वापर केला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, या क्षेपणास्त्रांचा वापर पश्चिम युक्रेनमधील शस्त्रास्त्रांचे गोदाम नष्ट करण्यासाठी करण्यात आला. (Ukraine-Russia War 25th day) दरम्यान, या युद्धात रशियाचे आजपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
इंधन टाक्या गमावल्या आहेत
किव्ह इंडिपेंडंटच्या म्हणण्यानुसार, या युद्धात रशियाचेही चांगलेच नुकसान झाले आहे. यामध्ये 19 मार्चपर्यंत रशियाचे मोठे नुकसान झाले आहे. तर, युक्रेनच्या म्हणण्यानुसार, युद्धात 14 हजार 400 रशियन सैनिक मारले गेले आहेत. तर, 95 विमानेही नष्ट झाली आहेत. तसेच, या व्यतिरिक्त रशियाने 115 हेलिकॉप्टर, 466 टाक्या, 213 तोफखान्याचे तुकडे, 1470 सशस्त्र वाहने, 72 एमएलआरएस, 914 इतर वाहने, 60 इंधन टाक्या गमावल्या आहेत. तसेच, रशियाला 17 ड्रोन, 44 विमानविरोधी युद्धाचाही फटका बसला आहे. याशिवाय 11 विशेष शस्त्रेही नष्ट करण्यात आली आहेत.
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
युक्रेनमध्ये अनेक आघाड्यांवर लढाई सुरू आहे, वेढा घातलेल्या बंदर शहर मारियुपोलमध्ये तीव्र लढाई सुरू आहे. युक्रेनच्या मंत्र्यांच्या सल्लागाराच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या सैन्याने मुख्य अझोव्स्टल स्टील प्लांटचे नियंत्रण गमावले आहे. आता नुकसान अटळ आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असही ते म्हणाले आहेत.
युद्धविराम चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या
झेलेन्स्की यांनी क्रेमलिनवर जाणीवपूर्वक 'मानवतावादी आपत्ती' निर्माण केल्याचा आरोप केला आहे. ते रशियाच्या व्लादिमीर पुतिन यांना चर्चेसाठी आग्रह करत आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये युद्धविराम चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या. मात्र, यामध्ये कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, रशियन सैन्याने मारिओपोल या बंदर शहरामध्ये मानवतावादी मदत रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथे रस्त्यावर लढाई सुरू आहे. युक्रेनचे उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक यांनी सांगितले की, शनिवारी (दि. 19 मार्च)रोजी 6,000 पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
रशियाने युद्ध संपवले नाही तर त्याचे दीर्घकालीन नुकसान होईल
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, रशियन सैन्याने मोठ्या शहरांना वेढा घातला आहे. मुळात त्यांना वाईट परिस्थिती निर्माण करायची आहे त्यासाठी त्यांनी हे केले आहे. तसेच, त्यांना अशी दयनीय परिस्थिती निर्माण करायची आहे की युक्रेनच्या नागरिकांना त्यांना सहकार्य करावे लागेल असही ते म्हणाले आहेत. याचवेळी झेलेन्स्की यांनी शनिवारी इशारा दिला की, ही रणनीती यशस्वी होणार नाही आणि रशियाने युद्ध संपवले नाही तर त्याचे दीर्घकालीन नुकसान होईल.
रशियाकडून युक्रेनचे शस्त्रास्त्रांचे गोदाम नष्ट
रशियाने यापूर्वी कधीही युद्धात उच्च-अचूक शस्त्रे वापरल्याचे कबूल केले नव्हते. राज्य वृत्तसंस्था RIA नोवोस्तीच्या मते, पश्चिम युक्रेनमधील संघर्षादरम्यान किंजल हायपरसोनिक शस्त्रांचा पहिल्यांदा वापर केला. हायपरसोनिक एरोबॅलिस्टिक मिसाईलसह किंजल एव्हिएशन मिसाईल सिस्टमने इव्हानो-फ्रँकिव्हस्क प्रदेशातील डेलियाटिन गावात मिसाईल आणि विमानचा वापर करणारे दारुगोळा असलेले एक मोठे भूमिगत गोदाम नष्ट केले असल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले आहे.
सुपरस्टार राम चरण अन् राजामौली यांची मदत
जगभरातून युक्रेनमधील लोकांना मदत केली जात आहे. त्यामध्ये कोणतेही क्षेत्र असो, सर्व मदतीचा हात पुढे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर साऊथचे सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि एसएस राजामौली यांनीही (RRR) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावलेल्या युक्रेनियन क्रू मेंबर्सला मदतीचा हात पुढे केला आहे.
हेही वाचा - World Oral Health Day : तोंडाची स्वच्छता कशी ठेवणार? वाचा ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट