नवी दिल्ली - हजारो भारतीय विद्यार्थ्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात व्हिसा 'अपॉईंटमेंट' घेतल्या आहेत, असे अमेरिकी दूतावासाने सांगितले. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांच्या व्हिसा अर्जांना सामावून घेण्याच्या आणि त्यांच्या कायदेशीर प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे अमेरिकेच्या एका ज्येष्ठ मुत्सद्दीने सांगितले.
अमेरिकन दूतावासाने ट्विट केले आहे की, 14 जूनपासून हजारो भारतीय विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यी व्हिसासाठी 'अपॉईंटमेंट' साठी अर्ज केले आहेत. परिस्थितीनुसार येत्या आठवड्यांत आम्ही अपॉईंटमेंटच्या संख्येत वाढ करत राहू. सध्या तांत्रिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.
अमेरिकेतील नवीन शैक्षणिक सत्र 1 ऑगस्ट किंवा त्यानंतर सुरू होईल. त्याचबरोबर, सोमवारपासून म्हणजेच अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मुलाखत स्लॉट सुरू करण्यात आला आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना लस बंधनकारक नाही. मात्र, कोरोनाचा चाचणीचा 72 तासांपूर्वी केलेला आरटी-पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असावा.
स्टुडंट व्हिसा...
अमेरिकेत जाण्यासाठी वेगवेगळे व्हिसा लागतात. यात शिक्षणासाठी स्टुडंट व्हिसा आवश्यक असतो. स्टुडंट व्हिसाअंतर्गत परदेशात गेल्यानंतर विद्यार्थ्याने युनिव्हर्सिटी व्यतिरिक्त कुठेही काम करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.