ETV Bharat / bharat

Delhi Crime News : सरकारी शाळेत रॅगिंग, तिसरीच्या विद्यार्थ्याचा प्रायव्हेट पार्ट धाग्याने बांधला! - तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर अत्याचार

दिल्लीच्या सरकारी शाळेत तिसरीच्या विद्यार्थ्यासोबत सिनियर्सनी क्रूरता केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (brutality with student in delhi government school). मुलाच्या घरच्यांनी त्याला अंघोळ घालण्यासाठी त्याचे कपडे काढले, तेव्हा त्यांना संपूर्ण प्रकरण समजले. (student private part tied with thread). काय आहे संपूर्ण प्रकरण वाचा.. (ragging with student in delhi government school).

student private part tied with thread
विद्यार्थ्याचा प्रायव्हेट पार्ट धाग्याने बांधला
author img

By

Published : Dec 30, 2022, 5:16 PM IST

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील एका सरकारी शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. (brutality with student in delhi government school). शाळेत शिकणाऱ्या चार ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याला मारहाण केली, शिवाय त्याचा प्रायव्हेट पार्टही रेशमी धाग्याने बांधला. (student private part tied with thread). अनेक दिवस निष्पाप विद्यार्थी वेदना सहन करत राहिला. भीतीमुळे त्याने घरात कोणालाच काही सांगितले नाही. मात्र बुधवारी मुलाच्या नातेवाईकांनी त्याला अंघोळ घालण्यासाठी कपडे काढले असता हा प्रकार उघडकीस आला. ही बाब गुरुवारी रात्री पोलिसांना कळवण्यात आली. त्याच वेळी, मुलाला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी ब्लेडच्या मदतीने घट्ट धागा कापला. मुलाला रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते, त्यानंतर गुरुवारी मुलाला डिस्चार्ज देण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Delhi Crime News). (ragging with student in delhi government school).

पीडित मुलाचे वय केवळ 8 वर्षे : कोटला मुबारकपूर परिसरातील पिलांजी गावात मनोज (नाव बदलले आहे) कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. तो बँड पार्टीमध्ये काम करतो, तर त्याची पत्नी खासगी नोकरी करते. त्यांना तीन मुले आहेत, त्यापैकी पीडित मुलगा (वय 8 वर्षे) सर्वात मोठा आहे. तो किडवई नगर पूर्व येथील अटल आदर्श विद्यालयात तिसरीच्या वर्गात शिकत आहे. तो 24 डिसेंबर रोजी शाळेत गेला होता, तेथे शौचालयात गेल्यावर चार ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी त्याला पकडले. हे सर्व विद्यार्थी पंधरा-सोळा वर्षांचे होते. त्यांनी त्याला मारहाण केली. त्याचवेळी एका विद्यार्थ्याने मुलाचा हात तर दुसऱ्याने त्याचे पाय धरले. एक विद्यार्थी गेटवर उभा असताना दुसर्‍याने मुलाच्या प्रायव्हेट पार्टला रेशमी धाग्याने घट्ट बांधले.

आरोपींनी धमकावले : यानंतर आरोपींनी त्याला धमकावले आणि याबाबत कोणाला काही सांगितले तर आई-वडिलांना मारून टाकू, असे सांगितले. या भीतीपोटी पीडित विद्यार्थ्याने शाळेत कोणालाच काही सांगितले नाही आणि तो घरी परतला. वेदना होत असल्याची तक्रार करूनही तो सहन करत राहिला. पुढचे दोन दिवस तो शाळेत गेला नाही. यानंतर 27 आणि 28 डिसेंबर रोजी तो शाळेत गेला, मात्र त्यानंतरही त्याने कोणत्याही शिक्षकाला काहीही सांगितले नाही.

ब्लेडच्या सहाय्याने धागा कापला : यानंतर बुधवारी संध्याकाळी या विद्यार्थ्याच्या वडिलांनी आंघोळीसाठी कपडे काढले तेव्हा प्रायव्हेट पार्ट पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. असे विचारल्यावर मुलाने सांगितले की, हा सर्व प्रकार शाळेतील ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत गुरुवारी पोलिसांना कळवण्यात आले आणि मुलाला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. फोन करून तेथे गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत डॉक्टरांनी ब्लेडच्या सहाय्याने धागा कापला. या मुलाला रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते आणि सर्व तपासण्या केल्यानंतरच त्याला गुरुवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

आरोपी विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी : पीडित मुलाचे वडील मुळचे उत्तर प्रदेशातील बरेलीचे रहिवासी आहेत. ते म्हणाले की, त्यांच्या मुलासोबत जे काही घडले ते खूप भयावह आहे. या घटनेत त्यांच्या मुलाचा जीवही गेला असता. शुक्रवारी सकाळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याला मुलासह शाळेत बोलावले, जिथे मुलगा आरोपी विद्यार्थ्यांची ओळख पटवेल. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. आपल्या मुलासोबत जे घडले ते कोणाच्याही बाबतीत घडू नये, त्यामुळे आरोपी विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आपली इच्छा आहे, जेणेकरून असे कृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत एक संदेश जाऊ शकेल, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.