ETV Bharat / bharat

Bigbul Rakesh Jhunjhunwala of Share Market बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचा जीवनप्रवास गुंतवणूकदारांसाठी प्रेरणादायी - राकेश झुनझुनवाला

भारतीय शेअर मार्केटचे बिगबुल राकेश झुनझुनवाला Bigbul Rakesh Jhunjhunwala of Share Market यांच्या निधनाने भारतीय या क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे अवघ्या पाच हजार रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करीत अब्जोपती होण्यापर्यंतची त्यांची वाटचाल संघर्षमय राहिली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे

Rakesh Jhunjhunwala
Rakesh Jhunjhunwala
author img

By

Published : Aug 14, 2022, 10:52 AM IST

मुंबई शेअर बाजारातील बिगबुल राकेश झुनझुनवाला Bigbul Rakesh Jhunjhunwala of Share Market यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आणण्यात आले. झुनझुनवाला यांना २-३ आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ब्रीच कँडी हॉस्पिटलने ज्येष्ठ व्यापारी झुनझुनवाला यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आज सकाळी ६.४५ वाजता रुग्णालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूची पुष्टी केली. झुनझुनवाला यांच्या मृत्यूचे कारण बहु-अवयव निकामी असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांचे पथक त्यांना वाचवण्याचा सतत प्रयत्न करत होते, मात्र ते होऊ शकले नाही. काल संध्याकाळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती.

पंतप्रधानांना व्यक्त केला शोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जीवनाने परिपूर्ण, विनोदी आणि अभ्यासपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्व होते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी आर्थिक जगामध्ये अमिट योगदान दिले आहे. भारताच्या प्रगतीबद्दलही ते खूप उत्कट होते, असे पंतप्रधान मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझूनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती.

Rakesh Jhunjhunwala
काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती.

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या निधनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शेअर बाजाराविषयीचा त्यांचा प्रचंड अनुभव आणि समज यामुळे असंख्य गुंतवणूकदारांना प्रेरणा मिळाली आहे. ते त्यांच्या उत्साही दृष्टिकोनासाठी नेहमी लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना, अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे.

राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफे म्हणूनही ओळखले जातात. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारामध्ये आपला कारकीर्द सुरू केली होती. थोड्याच कालावधीत ते भारतीय शेअर बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून गणले जाऊ लागले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एअरलाईन्स कंपनीही सुरू करण्याची घोषणा केली होती.

एअरलाईन क्षेत्रात प्रवेश राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातून प्रचंड पैसे कमावल्यानंतर या बिग बुलने एअरलाइन क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि 7 ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे.

झुनझुनवालाची ही यशोगाथा अवघ्या पाच हजार रुपयांपासून सुरू झाली. आज त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटींच्या आसपास आहे. या यशामुळे झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे असे संबोधले जाते. सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गमावत असतानाही झुनझुनवाला कमाई करतात, अशी त्यांची या क्षेत्रातली ख्याती होती.

हेही वाचा - राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राचा हिरवा कंदील; २०२२ मध्ये सुरू करणार वाहतूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.