ETV Bharat / bharat

Convention Of The CPI: भांडवलशाहीचे धोरण देशाला घातक; राष्ट्रीय नेत्यांचा एल्गार

निर्गुंतवणुकीच्या नावाखाली केंद्र सरकारने देश विकायला काढल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अमरजीत कौर यांनी केला आहे. (Convention Of The CPI) त्या भाकपच्या २४ व्या तीन दिवसीय राज्य अधिवेशनात अमरावती येथे बोलत होत्या.

आयटकच्या राष्ट्रीय महासचिव कॉ. अमरजित कौर अधिवेशनात बोलताना

author img

By

Published : Sep 19, 2022, 4:52 PM IST

Updated : Sep 19, 2022, 5:29 PM IST

अमरावती - देशात बेरोजगारी, महागाईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कामगारांच्या हाताला काम नाही. शासकीय आकडेवारीनुसार देशातील एकूण आत्महत्यांपैकी २५ टक्के या मजुरी करणाऱ्या कामगारांच्या आहेत. (convention of the Communist Party of India) दुसरीकडे मूठभर लोकांच्या हाती आर्थिक सूत्रे आली आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे धोरण देशासाठी घातक आहे. त्यामुळे आता अधिकारांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची गरज आहे असे मत मत आयटकच्या राष्ट्रीय महासचिव कॉ. अमरजित कौर यांनी व्यक्त केले आहे. त्या अमरवाती येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २४ व्या राज्य अधिवेशनात बोलत होत्या.

आयटकच्या राष्ट्रीय महासचिव कॉ. अमरजित कौर अधिवेशनात बोलताना

हातमजुरी करून गुजराण - देशातील विविध आणि ज्वलंत यांसह आर्थिक व राजकीय प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भाकपचे २४ वे राज्य अधिवेशन अमरावतीत १८ ते २० सप्टेंबर असे तीन दिवस होत आहे. (Convention Of The Communist Party of India) तब्बल २७ वर्षांनंतर हे अधिवेशन येथे होत आहे. राज्यभरातून हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. सर्व तरुण बेरोजगार आहेत. देशात एकूण आत्महत्यांपैकी २५ टक्के आत्महत्या या हातमजुरी करून गुजराण करणाऱ्यांच्या आहेत. असही यावेळी कौर म्हणाल्या आहेत.

क्राईम ब्युरोच्या अहवालातून पुढे - केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपण शेतकरी आत्महत्यांचे दुख: झेलतो आहे. चुकीच्या धोरणामुळे देशात बिकट आर्थिक समस्या निर्माण केली आहे. कुटुंबाचे पालन पोषण करण्यास कमी पडत असल्याने रोजंदारी मजूर आत्महत्या करीत आहे. देशात होत असलेल्या एकूण आत्महत्यांमध्ये २५ टक्के रोजंदारी कामगार असल्याचे सरकारच्या क्राईम ब्युरोच्या अहवालातून पुढे आल्याचे कौर यांनी सांगितले.

रस्त्यावर उतरून निषेध नोंदवणे ही काळाची गरज - कॉ. अमरजित कौर पुढे म्हणाल्या, देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशातील बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या फक्त १० टक्केच तरुणांकडे रोजगार आहे. उच्चशिक्षित डॉक्टर, इंजिनिअर, पदवीधर यापैकी फक्त ३३ टक्के तरुणांकडे रोजगार त्यामुळे तरुणांमध्ये असंतोष आहे. अधिकारासाठी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवणे ही काळाची गरज आहे. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्य सचिव तुकाराम भस्मे होते. स्वागताध्यक्ष साहेबराव विधळे, राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो, साधना पानसरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात तुकाराम भस्मे यांना कॉ. माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कारही बहाल करण्यात आला.

आपला लढा समतावादी - सध्या देशात फॅसिस्ट लोकांची सत्ता आहे. त्यामुळे या लोकांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी आपली लढाई ही समतावादी, मानवतावादी असल्याचे मत कॉ. भाचलंद कांगो यांनी यावेळी व्यक्त केले आहे. देशातील जातीव्यवस्था जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत आम्ही सत्तेत येणार नाही. त्यामुळे परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची काळाची गरज आहे. तसेच, न्यायाची लढाई लढण्याची गरज असून केंद्र सरकाचे धोरण उद्योगपतींसाठी असून देशातील गोरगरीब पुन्हा दारिद्र्याच्या खाईत ढकलला जात आहे अशी खंतही कांगो यांनी व्यक्त केली आहे.

अदानी-अंबानी यांचे सरकार - डाव्यांच्या एकजुटीशिवाय भारतात परिवर्तन शक्य नाही, असे सांगत एकजुटीसाठी भाकप नेहमीच पुढाकार घेणारा पक्ष आहे. तसेच, डावे पक्ष हे नेहमी लोकशाही व लोकांना बांधिल आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा येथील गतकाळातील सत्ता त्याचे जीवंत उदाहरण आहे. परंतु, तरीही भांडवली पक्ष कम्युनिस्टांना लोकशाहीविरोधी दर्शवून त्यांच्याबद्दल दुष्प्रचार करतात असा आरोप डॉ. भालचंद्र कांगो यांनी केला आहे. तसेच, सध्या देशात ‘हम दो-हमारे दो’ अर्थात मोदी-शहा आणि अदानी-अंबानी यांचे सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. ते अमरावती येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तीन दिवसीय 24 व्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते.

शहरातून निघाली महारॅली - अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महारॅली काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ही रॅली इर्विन चौक, रेल्वे स्टेशन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक मार्गे ते नेमाणी इन येथे सभास्थळी रॅलीचा समारोप करण्यात आला. अधिवेशनापूर्वी शहरातून निघालेल्या रॅलीने लक्ष वेधून घेतले होते.

Last Updated : Sep 19, 2022, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.