ETV Bharat / bharat

नर्स मोबाईलमध्ये गुंग; फोनवर बोलण्याच्या नादात महिलेला दिली दोनदा लस - vaccination news

कोरोनासारख्या धोकादायक व्हायरससोबत लोकं लढत असताना हैदराबादमध्ये एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका नर्सने महिलेला दोन वेळा कोरोना लस टोचवली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील हयातनगर मंडळाच्या कुंतलूर येथे हा प्रकार घडला आहे.

लसीकरण
लसीकरण
author img

By

Published : Jun 20, 2021, 12:44 PM IST

हैदराबाद - देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून राबवण्यात येत आहे. भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत 50 हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनासारख्या धोकादायक व्हायरससोबत लोकं लढत असताना हैदराबादमध्ये एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका नर्सने महिलेला दोन वेळा कोरोना लस टोचली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील हयातनगर मंडळाच्या कुंतलूर येथे हा प्रकार घडला आहे.

हयातनगर मंडळाच्या कुंतलूर येथील राजीव गृहकल्प कॉलनीतील रहिवासी लक्ष्मी प्रसन्ना (वय 21 वर्षे) गुरुवारी पेद्दा अंबरपेट येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये लसीकरणासाठी आली होती. तेथील ड्यूटीवर असलेली नर्स पद्मा मोबाईलवर कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त होती, फोनवर बोलता-बोलता तीने तरुणीला दोनदा लस टोचवली.

मी गुरुवारी सकाळी 8.30 वाजता पेद्दा अंबरपेटमधील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गेले होते. 11 वाजता नर्स पद्मा यांनी मला लसी टोचवली. त्याच वेळी त्यांना एक फोन आला. फोनवर बोलताना त्यांनी मला तिथेच बसण्याची सूचना केली. त्या काही सांगतील या उद्देशाने मी तिथेचे बसले. मात्र, त्यांनी फोनवर बोलत असताना मला लसीचा आणखी एक डोस दिला, असे पीडित तरुणी लक्ष्मीप्रसन्नाने सांगितले.

सध्या तरूणीची प्रकृती स्थिर -

युवतीला दोन डोस दिले गेले याची पुष्टी झालेली नाही. सिरिंजमध्ये औषध भरत असताना नर्सला फोन आला होता. तेव्हा तीने लस दिली नाही. फोनवर बोलल्यानंतर लसीकरण केले. या घटनेची चौकशी करण्याचे अतिरिक्त डीएमएचओला आदेश दिले होते, असे रंगारेड्डी जिल्हा डीएमएचओ स्वराज्यलक्ष्मी यांनी सांगितले. तथापि, तरुणीला खबरदारी म्हणून वनस्थलीपुरम एरिया रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवस स्वतंत्र खोलीत ठेवले होते. शनिवारी पहाटे तरूणीची प्रकृती स्थिर असल्याने तिला घरी पाठविण्यात आले.

देशातील आजची कोरोना स्थिती :

  • एकूण कोरोना रुग्ण : 2,98,81,965
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,87,66,009
  • एकूण सक्रिय रुग्ण : 7,29,243
  • एकूण मृत्यू : 3,86,713
  • आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 27,66,93,572

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.