ETV Bharat / bharat

India Corona Update :भारतात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटतेय मात्र ८०४ मृत्यू - India Corona Recovery

भारतातील दररोजच्या कोरोना रुग्णांच्या (India Corona New Patient) नोंदीत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासात 50 हजार 407 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काही दिवसांपुर्वी रोजचा आकडा 2 लाखाच्या पेक्षा जास्त असायचा. असे असलेतरी एका दिवसात कोरोना संसर्गाने मृत्यू (India Corona death) पावणाऱ्यां रुग्णांचा आकडा 804 आहे.

India Corona Update
भारत कोरोना अपडेट
author img

By

Published : Feb 12, 2022, 9:36 AM IST

Updated : Feb 12, 2022, 11:16 AM IST

दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूच्या संख्ये वर अद्याप नियंत्रण आलेले नाही त्यामुळेचिंता व्यक्त होत आहे. भारतात गेल्या 24 तासात 50 हजार 407 नवे कोरोना रुग्ण नोंदवल्या गेले आहेत. तर बरे होणाऱ्या (India Corona Recovery) रुग्णांचा आकडा 1 लाख 36 हजार 962 वर पोचला आहे. तर कोरोना संसर्ग झालेल्या 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहिती प्रमाणे देशात सध्या 6 लाख 10 हजार 443 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण संख्येच्या 1.43 टक्के आहेत. भारतातील दैनंदिन पाॅझिटिव्हीटी रेट 3.48 टक्के आणि साप्ताहिक पाॅझिटिव्हीटी रेट 5.07 टक्के नोंदवला गेला आहे.

महामारीच्या सुरुवातीपासून बरे झालेल्या रुग्णांची एकत्रित संख्या आता 4 कोटी 14 लाख 68 हजार 120 झाली आहे. परिणामी, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.37 टक्के आहे, तर मृत्यूदर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात 804 मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, एकूण मृत्यूची संख्या 5 लाख 07 हजार 981 झाली आहे.

दरम्यान, आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 14 लाख 50 हजार 532 चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. देशात आतापर्यंत एकूण 74.93 कोटी चाचण्या घेण्यात आल्या. सरकारने असेही म्हटले आहे की देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत एकूण 1,72,29,47,688 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

  • India reports 50,407 fresh #COVID19 cases, 1,36,962 recoveries and 804 deaths in the last 24 hours.

    Active cases: 6,10,443 (1.43%)
    Death toll: 5,07,981
    Daily positivity rate: 3.48%

    Total vaccination: 1,72,29,47,688 pic.twitter.com/xy9AJY5K4g

    — ANI (@ANI) February 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काल शुक्रवारी नोंदवल्या गेलेल्या आकडे वारी प्रमाणे गेल्या चोवीस तासांत म्हणजे गुरवारी देशात 67 हजार 84 रुग्ण नोंदवल्या गेले होते. तर, 1241 जणांचा मृत्यू झाला होता आहे. 1 लाख 67 हजार 882 रुग्णांना कोरोनावर मात केली. हा पॉझिटिव्हीटी रेट 4.44 टक्क्यांवर होता.

Last Updated : Feb 12, 2022, 11:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.