नवी दिल्ली: चिराग भागात मुलगा हवा असलेल्या एका आईने दोन महिन्यांच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येनंतर मुलीचा मृतदेह घरात पडलेल्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लपवून ठेवला (The mother killed two-year-old daughter and hid her in the oven) होता. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. घरात झडती घेतली असता ओव्हन मधे मुलीचा मृतदेह सापडला. मालवीय नगर पोलिसांनी (Malviya Nagar police ) मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मुलीच्या आईनेच तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करुन मुलीच्या पालकांची चौकशी करत आहेत.
पोलीस उपायुक्त विनिता मेरी जेकर यांनी सांगितले की, गुलशन कौशिक आपल्या कुटुंबासह चिराग भागात राहतो. कुटुंबात पत्नी डिंपल कौशिक शिवाय चार वर्षांचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी होती. गुलशनची आई आणि भाऊही त्याच्यासोबत राहतात. गुलशन घराखालीच किराणा दुकान चालवतात. सोमवारी पाचच्या सुमारास चिराग भागातून मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जिथे मुलीची आजी आणि शेजारी घरातील मुलीचा शोध घेत होते. घराची झडती घेतली असता, मुलीचा मृतदेह घराच्या दुसऱ्या मजल्यावर खराब झालेल्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सापडला. मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. प्राथमिक तपासात मुलीचा जन्म २७ जानेवारी २०२२ रोजी झाल्याचे उघड झाले. तसेच मुलीच्या आईला मुलगा हवा होता, त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर ती आनंदी नव्हती. शेजार्यांचे आणि नातेवाइकांनी सांगितलेकी, डिंपल आणि तिच्या पतीमध्ये याच मुद्द्यावरून अनेकदा भांडण झाले होते. ज्या खोलीतून मुलीचा मृतदेह सापडला त्या खोलीला बाहेरून कुलूप लावले होते.
हेही वाचा : Woman Body Found : मानोली परिसरात पत्र्याच्या पेटीत आढळला महिलेचा मृतदेह