ETV Bharat / bharat

लवकरच पावसाच्या सरी बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. विदर्भ आणि मराठवाडा उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला आहे. उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वाढल्यामुळे अनेक नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. त्यातच आता दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

लवकरच पावसाच्या सरी बरसणार
लवकरच पावसाच्या सरी बरसणार
author img

By

Published : Jun 5, 2022, 8:55 AM IST

मुंबई - राज्यात जून महिन्यामध्ये पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच यंदा मान्सून सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. यावर्षात साधारण 96 ते 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सात जूननंतर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्याने पावसाची प्रतिक्षा लांबली आहे.

पुढील पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. तसेच तामिळनाडू, कोकण आणि गोव्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र, विदर्भातील तुुरळक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, जून महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असून खंड पडण्याची देखील शक्यता आहे. तसेच जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात 84 ठिकाणी नोंदविण्यात आलेले कमाल आणि किमान तापमान, वातारणातील आर्द्रता ताशी वाऱ्याचा वेग आणि सुर्यप्रकाशाचा कालावधी या काही घटकांचा अभ्यास केल्यानंतर पुढील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा - Today Vegetable Prices: भाजीपाल्याचे भाव कडाडले; मान्सूनपूर्व पावसाचा फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.