ETV Bharat / bharat

The King Of Cheating : आंध्र प्रदेशात महाठग तरुणाकडून हजार महिलांची फसवणूक, 10 कोटींचा लावला चुना - तरुण 1000 महिला तरुणी फसवणूक

आरोपी वामसी कृष्णा ( Vamsi Krishna fraud case ) हा कृष्ण, हर्षा, हर्षवर्धन इत्यादी वेगवेगळ्या नावांनी फिरत आहे. तो मूळचा रामचंद्र राव पेटा ( Ramchandra Rao Peta accused ) , पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आहे. त्याने राजमुंद्री येथे बीटेक पूर्ण केले. नोकरीच्या शोधात 2014 मध्ये हैदराबादला आल्यानंतर त्याने कुकटपल्ली व्हायब्स हॉटेलमध्ये दोन वर्षे काम केले. तेथे काम करत असताना अधिक पैसे कमवण्यासाठी त्याने मित्रांसोबत अश्वशर्यती आणि क्रिकेटवर सट्टा ( horse racing and cricket betting ) लावला.

आरोपी
आरोपी
author img

By

Published : May 11, 2022, 9:14 PM IST

Updated : May 11, 2022, 10:42 PM IST

अमरावती ( आंध्र प्रदेश ) - आंध्र प्रदेशातील सुमारे 1 हजार महिला व तरुणींना फसविणाऱ्या महाठगाला सायराबाद पोलिसांनी ( Cyberabad police arrest cheater ) अटक केली आहे. वामसी कृष्णा असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. त्याने महिलांची सुमारे 10 कोटी रुपयांची फसवणूक ( Man cheated about thousand women ) केली आहे.

आरोपी वामसी कृष्णा ( Vamsi Krishna fraud case ) हा कृष्ण, हर्षा, हर्षवर्धन इत्यादी वेगवेगळ्या नावांनी फिरत आहे. तो मूळचा रामचंद्र राव पेटा ( Ramchandra Rao Peta accused ) , पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आहे. त्याने राजमुंद्री येथे बीटेक पूर्ण केले. नोकरीच्या शोधात 2014 मध्ये हैदराबादला आल्यानंतर त्याने कुकटपल्ली व्हायब्स हॉटेलमध्ये दोन वर्षे काम केले. तेथे काम करत असताना अधिक पैसे कमवण्यासाठी त्याने मित्रांसोबत अश्वशर्यती आणि क्रिकेटवर सट्टा ( horse racing and cricket betting ) लावला. तो सहा वर्षांपूर्वी ट्रॅव्हल-कन्सल्टन्सी कार्यालयात कर्मचारी म्हणून रुजू झाला. तेथे आलेल्यांना नोकऱ्या देण्यासाठी त्याने मोठी रक्कम आकारली. त्याच्याकडून फसवणूक झालेल्या पीडितांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर कुकटपल्ली पोलिसांनी ( Kukatpally police ) त्याला अटक केली. काही दिवसांनी तो तुरुंगातून बाहेर आला होता.

अशी करायचा महिला व तरुणींची फसवणूक- तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने फसवणूक करून पैसे लुटण्याचा नवीन मार्ग अवलंबला. त्याने गायत्री, माधुरी, सात्विका आणि श्वेता या मुलींच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट उघडले. त्या खात्यांद्वारे तो इतर महिला आणि मुलींसमोर स्वत:ची तरुणी म्हणून ओळख करून देत होता. हर्षा उर्फ ​​हर्षवर्धन हा श्रीमंत असल्याचा दावा करत मुलींना टार्गेट करत होता. रोजगाराची संधी देतो, असे सांगून त्यांनी मुलींशी ओळख केली. आवाज बदलणाऱ्या अॅप्सच्या मदतीने आपला आवाज बदलत असे. त्याने यानामचे आमदार श्रीनिवास अशोक यांचे बनावट इंस्टाग्राम अकाउंटही बनवले. आमदारांचे फोटो डीपी म्हणून ठेवले. आमदार असल्याप्रमाणे इतरांशी गप्पा मारत असे. सुरुवातीला आरोपी हा तरुणींच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा करत असे. अचानक मोठ्या प्रमाणात पैसा आल्याने त्यांचा त्याच्यावरील विश्वास वाढल्यानंतर गैरफायदा घेत असे. महिलांना बँक खाते बंद झाल्याचे सांगून पैसे मागत असते. त्या पैशातून क्रिकेट बुकींना बुक करणे आणि अश्वशर्यतीसाठी पैसे करत असे.

पीडितांपैकी केवळ 50-60 जणींची तक्रार-ऑनलाइन विवाह परिचय साइटवर विधवांसह घटस्फोटित महिलांची निवड करण्यासाठी आणि त्यांच्याशी लग्न करण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात पैसे आकारले. 2016 पासून त्याच्याकडून हजारांहून अधिक तरुणी आणि महिलांची फसवणूक झाल्याचे दिसते. पीडितांपैकी केवळ 50-60 जणींनी धाडसाने पोलिसांकडे तक्रार केली. सायराबाद पोलिसांच्या माहितीनुसार ऑनलाईन मॅट्रिमोनिअल्समध्ये, त्याने विधवा आणि घटस्फोटित महिलांशी स्वतःची ओळख करून दिली. त्यांच्याशी लग्न करू असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटले होते. महिलांना वाटेल की त्याला खरोखर पैशाची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्याला पैसे दिले आहेत.

विमानाने प्रवास - आरोपींकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये आणखी 30 पीडितांची ओळख पटली. सहा वर्षांच्या कालावधीत आरोपीने सुमारे 5 कोटी रुपयांचा सट्टा लावला आहे. चेन्नई, बंगळुरू, मुंबई, पुणे या ठिकाणी क्रिकेट सट्टा आणि घोड्यांच्या शर्यतीसाठी विमानाने प्रवास करत असे. पोलीस कार आणि ट्रेनमधून प्रवास करत असताना तो फ्लाइटमध्ये पळून जायचा. सायबराबादचे पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकांनी वामसी कृष्णाला अटक केली.

हेही वाचा-Youth Dancing With Weapon : 'तमंचे पर डिस्को' कार्यक्रमात तरुणाने काढली बार गर्ल समोर बंदुक

हेही वाचा-भारत बायोटेक कोरोना संपविणारी विकसित करणार लस , कंपनीला मिळाला 149 कोटी रुपयांचा निधी

हेही वाचा-Mother becomes a tomboy for Daughter : मुलीसाठी आई झाली वडील, 30 वर्षांपासून पुरुषासारखे राहणीमान

Last Updated : May 11, 2022, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.