बांदा: मध्य प्रदेशातील छतरपूर येथून उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ट्रेनने घरी येत असलेल्या एकट्या मुलीचा आधी विनयभंग आणि नंतर बलात्कार करण्याचा प्रयत्न (Attempted rape by molestation) झाला. त्या मुलीने या प्रकाराला विरोध केल्यावर (resisting rape) तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आले. (The girl was thrown from a moving train) या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या मुलीला मध्य प्रदेशातील खजुराहो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती जीवाशी लढत आहे. तीच्या शरीरावर अनेक हाडे मोडली असून अनेक खोल जखमा आहेत.
झाशी विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त आलोक कुमार घटनास्थळी पोहोचले आहेत. याप्रकरणी जीआरपी जबलपूर आणि आरपीएफ झाशीचे पथक तपास करत आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा केला जात आहे. ही घटना मध्य प्रदेशातील राजनगर (छतरपूर) जवळील गावातील आहे. येथून 25 वर्षीय अविवाहित तरुणी खजुराहो-महोबा पॅसेंजर ट्रेनने बांदा येथे जात होती.
बोगीत तीच्या शेजारी बसलेल्या तरुणाने तीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ट्रेन सुरू झाल्यावर त्याने तिच्यावर जबरदस्ती सुरू केली व बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत स्वत:चा बचाव करण्यासाठी मुलीने त्याच्या हातला चावा घेतलाला. त्यामुळे आरोपी तरुणाच्या हातातून रक्त वाहू लागले. यानंतर आरोपीने मुलीला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला केसांनी ओढून ट्रेनच्या दरवाजात ओढले आणि चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : विद्यार्थिनींना आमिष देऊन शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल