हैदराबाद - आपली कामाची प्रलंबित रक्कम लवकरात लवकर या मागणीसाठी एक तेलगू चित्रपटाच्या ज्युनियर आर्टिस्टने सोमवारी ज्युबली हिल्स येथील एका आघाडीच्या चित्रपट प्रॉडक्शन हाऊससमोर अर्धे पोशाख घालून निदर्शने केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. ( Telugu Movie Junior Artist ) तीने आरोप केला आहे की, चित्रपट निर्मिती कंपनीने मला चित्रपटासाठी पैसे दिले नाहीत. त्यामुळे मी हे पाऊल उचलल आहे.
तीने रोड नंबर 45 वरील प्रोडक्शन कंपनीसमोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. रस्ता साफ करत असलेल्या (GHMC) कर्मचार्यांनी तिची दखल घेतली आणि तत्काळ या घटनेबाबत पोलिसांना सूचना दिली. ( Telugu Movie Junior Artist in Telangana ) माहिती मिळताच ज्युबली हिल्स पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने कलाकाराला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.
ती (2019)पासून गीता आर्ट्स ऑफिस आणि फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सवर नियमितपणे आरोप करत आहे. तिने यापूर्वी निर्मिती कंपनीशी संबंधित असलेल्या टॉलिवूड निर्मात्या बनी वासवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, याबाबत गीता आर्ट्सनेही स्पष्टीकरण जारी केले होते, की ही महिला गेल्या काही दिवसांपासून उपद्रव करत होती आणि पोलिसांच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. ज्युबली हिल्स आणि माधापूर पोलीस ठाण्यातही तिच्याविरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Pulitzer Prize: दिवंगत फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांचा पुलित्झर पुरस्काराने सन्मान