श्रीनगर - श्रीनगरमध्ये उणे 6.4 आणि जम्मूमध्ये 3 अंश सेल्सिअस तापमानासह कालच्या रात्रीची हिवाळ्यातील सर्वात थंड रात्र म्हणून नोंद झाली. त्याचबरोबर लडाखच्या द्रास शहरात तापमान वजा 26.5 नोंदविण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'या हंगामात या दोन शहरांमध्ये सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये द्रास शहर सर्वात थंड आहे. तथापि, वर्षाच्या अखेरीस या दोन्ही केंद्र शासित प्रदेशांमध्ये या प्रदेशात कोणत्याही मोठ्या हिमवृष्टीची शक्यता नाही. 21 ते 22 डिसेंबर दरम्यान फक्त हलका पाऊस / बर्फवृष्टी होणे अपेक्षित आहे.'
हेही वाचा - लेहमध्ये पारा शून्याच्या 12.9 अंश खाली, जम्मू-काश्मीरमध्येही तापमान घसरले
पहलगाममध्ये रात्रीचे किमान तापमान उणे 8.9 आणि गुलमर्ग वजा 11.0 नोंदले गेले. तर, लडाखमधील लेह येथे वजा 16.1 आणि कारगिल वजा 16.4 नोंदविले गेला.
जम्मूतील कटरामध्ये किमान तापमान 3 अंश सेल्सिअस, बटोटेमध्ये वजा 1.2, बनिहालमध्ये वजा 2.6 आणि भद्रवाहमध्ये उणे 3.3 अंश सेल्सियस नोंदले गेले.
'चिल्लई कलां' नावाची 40 दिवस चालणारी तीव्र थंडी 21 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 31 जानेवारीला संपेल. चिल्लई कलां दरम्यान होणाऱ्या प्रमुख हिमवर्षावामुळे
जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जलाशयांमध्ये बारमाही पाणी राहते.
या जलाशयांचा वितळणारा बर्फ उन्हाळ्याच्या महिन्यांत विविध नद्या, तलाव आणि झऱ्यांना पाणी पुरवतो.
हेही वाचा - पश्चिम बंगालच्या मिठायांमध्ये मेदिनीपूरच्या 'बाबरशा'ला विशेष स्थान