नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी टीका केली आहे. राणेंचे वक्तव्य चुकीचे असेल, मात्र त्यांना झालेली अटक म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे, असे वक्तव्य भाजपचे पात्रा यांनी केले.
हेही वाचा - NARAYAN RANE ARREST: सुरुवात राज्य सरकारने केली, शेवट आम्ही करू- आमदार आशिष शेलारांचा इशारा
सन्मानीय नेत्याला अटक करणे चुकीचे आहे, राज्यात लोकतंत्र शर्मसार झाले आहे. शर्जील विरोधात कुणीही कारवाई करत नाही. राऊत महिलांविरोधात अनेक विधाने करतात, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. बदल्याच्या भावनाने ही कारवाई करण्यात आली आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संदीप पात्रा म्हणाले.
राणे यांना अटक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले आहेत. नारायण राणे यांच्यावर नाशिक, पुण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. तसेच, रत्नागिरी पोलिसांकडून नारायण राणे यांना अटकही झाली आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे?
देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावे. सरकार कोण चालवत आहे ते कळतच नाही. ड्रायव्हरच नाही.
नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्याचे भाजप समर्थन करत नाही - फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन भारतीय जनता पार्टी करत नाही, मात्र मंत्री आणि व्यक्ती म्हणून भारतीय जनता पार्टी नारायण राणे यांच्या मागे उभी असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज त्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पोलीस राज्य सरकारच्या दबावात येऊन काम करत असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेतून फडणवीस यांनी केला.