ETV Bharat / bharat

Apne CM ko Thanks Kehna : तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी गोव्यातून दिल्लीला जिवंत परत जातोय - कन्हैया कुमार - कन्हैया कुमार यांची गोवा भाजपवर टीका

भाजप सरकारविरोधात गोव्यातील राजभवन (Goa Rajbhavan) समोर काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन (Congress Agitation) करण्यात आले होते. या आंदोलनात काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार (Congress leader Kanhaiya Kumar) सहभागी झाले होते. यावेळी ते पोलिसांना म्हणाले की, 'तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी दिल्लीला जिवंत परत जातोय'.

Kanhaiya Kumar
कन्हैया कुमार
author img

By

Published : Jan 8, 2022, 12:33 AM IST

Updated : Jan 8, 2022, 2:05 AM IST

गोवा - भाजप सरकारविरोधात गोव्यातील राजभवन (Goa Rajbhavan) समोर काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन (Congress Agitation) करण्यात आले होते. या आंदोलनात काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार (Congress leader Kanhaiya Kumar) सहभागी झाले होते. आंदोलक राजभवनात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी वाटेतच अडवून माघारी पाठवले. यावेळी बोलताना कन्हैया कुमार पोलिसांना म्हणाले की, 'तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी दिल्लीला जिवंत परत जातोय'. सध्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.

काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार
  • तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा मी परत सुखरूप गेलो- कन्हैया कुमार

पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवल्यानंतर कन्हैया कुमार यांनी पोलिसांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, जर तुम्ही आम्हाला आज अडवले पण भाजपमुळे तुमच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, त्यांनी तुमची पेन्शन बंद केली, जर भाजप सत्तेत राहिली तर तुमच्यासह सगळ्यांचे भवितव्य धोक्यात येईल. तसेच ते पोलिसांना म्हणाले की, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी दिल्लीला जिवंत परत जातोय.

  • काँग्रेसचा राजभवनवर मोर्चा -

भाजप सरकारविरोधात जनतेत असणाऱ्या विविध असंतोषाच्या मागण्यांवर कारवाई व्हावी यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई यांची भेट घेण्याचे ठरवले होते. मात्र काँग्रेसने या भेटीला विरोध मोर्चा केल्याने पोलिसांनी हा मोर्चा राजभवनच्या अगोदरच अडवला. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी भाषणबाजी व भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

  • राज्यपालांनी भेट नाकारल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक -

मागच्या काही दिवसांपासून राज्यात नोकरभरती घोटाळा, महिला असुरक्षितता, भाजपच्या पदाधिकारी यांच्या नातेवाईकांना नोकऱ्या, सेक्स स्कॅडंल आदी विषयांवरून काँग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भाजपने त्यांना केराची टोपली दाखवत वेळोवेळी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर काँग्रेसने राजभवनवर मोर्चा काढण्याचे निश्चित केले होते. मात्र, राज्यपालांनी भेट नाकारल्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राजभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवून माघारी पाठवले.

माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, कन्हैया कुमार, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोदनकार, खासदार फ्रान्सिस सर्दीन तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • पंतप्रधान मोदी म्हणाले होते तेव्हा की, '... भटिंडा विमानतळापर्यंत सुखरुप पोहचलो'

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदी रस्त्याने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात होते. यादरम्यान आंदोलकांनी सुमारे ३० किमी अंतरावरील उड्डाणपुलावर त्यांचा मार्ग अडवला होता. 15-20 मिनिटांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पंतप्रधानांचा ताफा भटिंडा विमानतळावर परतला. भटिंडा विमानतळावर परतल्यावर पंतप्रधान मोदींनी तेथील अधिकाऱ्यांना सांगितले, "तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, की मी भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत परत पोहचलो."

Last Updated : Jan 8, 2022, 2:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.