श्रीनगर : दहशतवाद्यांनी सांगलीतील दोन मजुरांवर गोळीबार करुन त्यांना जखमी केल्याने खळबळ उडाली. ही घटना दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लालचौक भागात मंगळवारी संध्याकाळी झाला. दहशतवाद्यांनी या मजुरांवर हल्ला करुन अंधाराचा फायदा घेत पळ काढला. अक्षय कांता आणि सौरव प्रदिप असे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या त्या दोन तरुणांची नावे आहेत. त्यांना एसएसएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे.
अनंतनाग जिल्ह्यातील लालचौक भागात गोळीबार : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लालचौक भागात अक्षय कांता आणि सौरव प्रदिप हे दोन सांगलीतील मजूर काम करत होते. मात्र दहशतवाद्यांनी या दोघांवर मंगळवारी संध्याकाळी लालचौक परिसरात हल्ला केला. दहशतवाद्यांनी पिस्तुलातून या मजुरांवर गोळीबार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी मंगळवारी दिली.
अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी काढला पळ : सांगलीतील दोन मजुरांवर काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील लालचौकात गोळीबार केला. मात्र हा हल्ला संध्याकाळी झाल्याने दहशतवाद्यांनी लालचौकामधून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. या परिसरात आता नाकेबंदी करण्यात आली असून सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दोन्ही मजुरांची प्रकृती स्थिर : सांगलीतील मजुरांवर हल्ला करुन दहशतवादी पळ काढण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी दोन बाहेरील मजुरांवर गोळीबार केला. दोन्ही जखमी नागरिकांना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोधमोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) विजय कुमार यांनी दिली. दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पिस्तुलांचा वापर केला आहे. दोन्ही मजूर बंदुकीच्या गोळीने जखमी झाले आहेत. मात्र त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
टीआरएफने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी : अनंतनाग जिल्ह्यातील लालचौक परिसरात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील दोन मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन्ही मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या मजुरांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असून सुरक्षा दल लवकरच दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळतील, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली. टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराची नाकेबंदी केली असून कसून शोध सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.