श्रीनगर: उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टणच्या येडीपोरा गावात शुक्रवारी झालेल्या चकमकीत जैशच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे (terrorist killed in kashmir). हे दहशतवादी बारामुल्ला येथील अग्निवीर भरती रॅलीवर हल्ला करण्याची योजना आखत होते. बारामुल्लाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रईस मोहम्मद भट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दहशतवादी जिल्ह्यातील 10 सेक्टर हैदरबेग मुख्यालयात सुरू असलेल्या लष्कराच्या भरती रॅलीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने बारामुल्ला येथे आले होते (terrorists killed in baramulla).
सेनेच्या विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे गावात एक संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. शोध मोहीमे दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या चकमकीत हे जैशचे दोन स्थानिक दहशतवादी ठार झाल्याचा दावा ADGP काश्मीर यांनी केला आहे.