श्रीनगर - बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती अद्याप मिळाली नाही.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने पुंछ जिल्ह्यातील बालाकोट परिसरात सायंकाळी सहाच्या दरम्यान शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.