हरदोई (उत्तर प्रदेश) : माश्यांमुळे होणाऱ्या अनेक आजारांबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की माश्यांमुळे लोकांची नाती तुटतात? त्यांचे लग्न होत नाही! होय, असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील हरदोई येथून समोर आले आहे. (terror of flies in villages of hardoi). येथे अहिरोरी ब्लॉकमधील 10 गावांमध्ये माशांचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे येथील लोक लग्न करू शकत नाहीत. परिस्थिती अशी आहे की या माशांमुळे लोकांना बसणे, उठणे, खाणे-पिणे अवघड झाले आहे. (Flies in villages of hardoi Uttar Pradesh). (no one is getting married due to flies)
यावर्षी गावात एकही विवाह झाला नाही : स्थानिक रहिवासी अजय वर्मा सांगतात की, माशांमुळे जगणे कठीण झाले आहे. झोपण्याचा प्रयत्न करताच त्यांना माश्या चावायला लागतात. त्यामुळे शांत झोप लागत नाही. लग्नासाठी मुलगी सुद्धा मिळत नाही. गेल्यावर्षी गावात सात विवाह झाले. मात्र यंदाच्या लग्नसराईत गावात आत्तापर्यंत एकही लग्न झाले नाही. येथे माशांचा अतिशय जास्त प्रादुर्भाव असल्याने येथे कोणीही आपल्या मुलीचे लग्न करण्यास तयार नाही. माशांचा प्रादुर्भाव एवढा वाढला आहे की जगणे देखील कठीण झाले आहे. नविन लग्न झालेल्या महिला माहेरी निघून चालल्या आहेत असे गावातील महिला सांगतात. लोकं सांगत आहेत की त्यांच्या बायका माहेरून परतायला तयार नाहीत. यामुळे आता त्यांचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे.
पोल्ट्री फार्म मुळे माशांचा प्रादुर्भाव : 2014 मध्ये येथे कमर्शियल लेयर्स फार्म म्हणजेच पोल्ट्री फार्म स्थापन करण्यात आला. त्यानंतर 2017 मध्ये उत्पादन सुरू झाले. येथे दररोज दीड लाख कोंबडीची अंडी तयार होत होती. फार्म उघडल्यानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले होते. पण नंतर हळूहळू माशांची संख्या वाढू लागली. (flies due to poultry farm). तेथील अस्वच्छतेमुळे आजूबाजूच्या अनेक गावात माशांचा थवा जमला. याबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांनी ही जबाबदारी प्रदूषण विभागाची असल्याचे सांगून टाळाटाळ केली. बधैयानपुरवा गावातील लोक माशांच्या उपद्रवामुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. गेल्या वर्षभरात येथील अनेक महिलांनी घर सोडले आहे. तसेच कुईया, पट्टी, दही, सलेमपूर, फतेहपूर, झाल पूर्वा, नया गाव, देवरिया आणि एकघरा येथे राहणार्या लोकांनाही माशांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.