हैदराबाद - कल्पना चावला व सुनिता विल्यम्स यानंतर आणखी भारतीय मुलगी अंतराळ विश्वात इतिहास रचणार आहे. व्हर्जिन गॅलक्टिक या खासगी अंतराळ एजन्सीने युनिटी २२ या अंतराळयानाने अवकाशात झेप घेण्याचे जाहीर केले आहे. ही घोषणा कंपनीचे मालक सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी केली आहे. अंतराळ मोहिमेत त्यांच्यासोबत तीन व्यक्ती अंतराळ प्रवास करणार आहेत. यामध्ये मूळ भारतीय असलेल्या सिरिशा बांदलाचा समावेश आहे.
सिरिशा ही मूळची आंध्र प्रदेशमधील आहे. तिला कंपनीच्या उपाध्यक्षांबरोबर अंतराळ प्रवास करण्याची संधी मिळालेली आहे. ती वॉशिंग्टनला स्थायिक झाली आहे. तिने वॉशिंग्टनमधून एअरोस्पेसमध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविली आहे. तर अॅस्ट्रॉनॉटिकल इंजिनिअरिंगही पूर्ण केले आहे. जॉर्ज वॉशिंग्टनमधून एमबीएची पदवी मिळविली आहे. तिने व्हर्जिन गॅलक्टिकमध्ये २०१५ पासून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
हेही वाचा- सलग दुसऱ्या सोन्याच्या दरात दिवशी वाढ; चांदीच्या दरात घसरण
व्हर्जिन गॅलक्टिककडून अंतराळ पर्यटनाचा प्रयोग-
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी स्वत: ब्ल्यू ओरिजन कंपनीद्वारे आखलेल्या अंतराळ प्रवासातस सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या घोषणेनंतर व्हर्जिन गॅलक्टिक कंपनीनेही खासगी अंतराळ प्रवास क्षेत्रात प्रवेश केल्याचे जाहीर केले. या मोहिमेत भारतीय मुलीला संधी मिळाले आहे. या अंतराळ मोहिमेकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. व्हर्जिन गॅलक्टिक ही अंतराळ पर्यटनाचा प्रयोग करणार आहे. त्यासाठी कंपनीने अमेरिकन सरकारकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आहेत.
हेही वाचा-सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत पुलवामामध्ये ४ दहशतवादी ठार
सिरिशाच्या आजोबांनी व्यक्त केला आनंद
सिरिशा बांदलाचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर जिल्ह्यात झाला. सिरिशाला अंतराळात प्रवास करण्याची संधी मिळाल्याने तिच्या आजोबांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, की सिरिशा ही अंतराळ प्रवास करणारी पहिली तेलुगु महिला ठरणार आहे. त्यांनी पीकशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. ते गुंटूर जिल्ह्यातील पिडुगुरुल्ला येथे राहतात. सिरिशाचे वडील मुरलीधर यांनी १९८९ मध्ये अमेरिकेत प्लांट पॅथॉलॉजीमध्ये पीएचडी केली आहे. तेव्हापासून ते अमेरिकन सरकारमध्ये काम करत आहेत. तिचे आई अनुराधाही यादेखील अमेरिकेन सरकारमध्ये काम करतात. सिरिशाचे कुटुंब वॉशिग्टंन डी. सी. मध्ये राहते.
हेही वाचा-कोरोनाच्या नवीन व्हेरियंटवर कोव्हॅक्सीन लस प्रभावी; अमेरिकेच्या NIH चा दावा
दरम्यान, यापूर्वी सुनिता विल्यम्स व कल्पना चावला या मूळ भारतीय महिलांनी अंतराळात झेप घेतली होती.