ETV Bharat / bharat

TRS Activist Murdered तेलंगणात तिरंगा फडकवल्यानंतर काही मिनिटांतच टीआरएस नेत्याची हत्या - Tammineni Krishnaiah

तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी टीआरएस नेते तम्मिनेनी कृष्णैया यांची हत्या केली Telangana TRS activist stabbed to death होती. काही दिवसांपूर्वीच ते सीपीएम सोडून टीआरएसमध्ये दाखल झाले Khammam district Telangana होते.

Tammineni Krishnaiah
तम्मिनेनी कृष्णैया
author img

By

Published : Aug 16, 2022, 12:44 PM IST

खम्मम तेलंगणात सोमवारी राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर काही मिनिटातच टीआरएस नेते तम्मिनेनी कृष्णय्या यांची चार अज्ञात व्यक्तींनी हत्या Telangana TRS activist stabbed to death केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण लक्षात घेता प्रशासनाने कलम 144 लागू केले आहे. तेलंगणा राष्ट्र समिती नेत्याची जिल्ह्यातील खम्मम Khammam district Telangana ग्रामीण मंडळाच्या तेलदारुपल्ली गावात चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून हत्या केली.

सोमवारी सकाळी राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभातून टीआरएस नेते परतत असताना ही घटना घडली. खम्मम जिल्ह्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार तम्मिनेनी कृष्णैया हे राष्ट्रध्वज फडकावून दुचाकीवरून परतत होते. तेलदारुपल्ली गावाच्या प्रवेशद्वारावर ऑटोरिक्षातून आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.

एसीपी म्हणाले तेलदारपल्लीच्या प्रवेशद्वारावर एका ऑटोमध्ये चार जण आले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला करून पळ काढला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांनी पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने CPI M नेत्या तमिनेनी कोटेश्वरा राव यांच्या निवासस्थानासमोर दगडफेक केली. यामध्ये त्यांच्या निवासस्थानाचे नुकसान झाले.

पोलिस आयुक्त म्हणाले आम्ही जमावाला पांगवले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत. तेलदारुपल्ली ग्रामपंचायतमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तम्मिनेनी कृष्णय्या यांनी काही वेळापूर्वी सीपीएम सोडल्यानंतर टीआरएसमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा टीआरएस नेता श्रीनिवास राव यांची नक्षलवाद्यांकडून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.