हैदराबाद - कोरोनाच्या संसर्गाचे कमी झाल्याने तेलंगाण सरकारने नागरिकांकरिता मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. तेलंगाणा मंत्रिमंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेला लॉकडाऊन रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसेच रविवारी रात्रीपासून संचारबंदीही रद्द करण्यात आली आहे.
तेलंगाणामधील कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचा अहवाल हा वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने राज्य सरकारला दिला. या अहवालानुसार तेलंगाणा मंत्रिमंडळाने लॉकडाऊन मागे घेण्याचा निर्णय घेतला. तेलंगाणा मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
हेही वाचा-'माहिती तंत्रज्ञान नियमावली 2021'च्या तरतुदींवर भारताने पुर्नविचार करावा - संयुक्त राष्ट्र
तीनवेळा लॉकडाऊनच्या वेळेत बदल-
- यापूर्वी तेलंगाणा सरकारने 12 जूनपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. तेलंगाणामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. सरकारने या काळात सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत चार तासासाठी खरेदी करण्याची परवानगी दिली होती.
- ही मुदत संपल्यानंतर तेलंगाणा सरकारने लॉकडाऊन वाढवून सकाळी 6 ते सांयकाळी दुपारी 2 या वेळेत ग्राहकांना खरेदी करण्यासाठी परवानगी दिली होती.
- कोरोनाचे नवीन रुग्ण कमी आढळत असल्याने सरकारने लॉकडाऊनमध्ये सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ग्राहकांना खरेदी करण्याची परवानगी दिली होती.
हेही वाचा-‘फ्लाईंग शिख’ मिल्खा सिंग यांच्या निधनावर मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली...
अखेर, आज लॉकडाऊन हटल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.