हैदराबाद - काही मुलांची बुद्धिमत्ता अफाट असल्यामुळे त्यांची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते. तेलंगणामधील जान्हवीने आपल्या बुद्धिमत्तेमुळे वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घ्यायला भाग पाडले ( Jhanvi Wonder Book of Records ) आहे. जान्हवी तेलुगु, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, मराठी, तमिळ, नेपाळी, कन्नड, ओरिया, उर्दू, हिंदी, बंगाली, लंबाडी, मल्याळम, दक्षिण आफ्रिकन अशा १७ भाषांमध्ये ( Telangana girl singing in 17 languages ) गाते.
जान्हवी ही मंचेरियल येथे राहणाऱ्या सुजाता आणि मुरली यांची एकुलती एक मुलगी आहे. जान्हवी सध्या एका खासगी ज्युनियर कॉलेजमध्ये इंटरमिजिएटच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिची गाण्याची आवड पाहून तिच्या पालकांनी जान्हवीला छंद जोपासण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले.
मंत्री रेड्डी यांनी दिल्या शुभेच्छा- अलीकडेच, जान्हवीचे नाव आंतरराष्ट्रीय वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ( International Wonder Book of Records ) नोंदवले गेले. मंत्री इंदिराकरण रेड्डी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी जान्हवीचे अभिनंदन केले आहे. 17 भाषांमध्ये गाण्याची तिची क्षमता ( girl singing in 17 languages ) चर्चेचा विषय ठरली आहे. मंत्री इंदिराकरण रेड्डी यांनी जान्हवीला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या ती ऑनलाइन कर्नाटक संगीत शिकत आहे.
बालपणापासून नृत्य, गायन आणि मिमिक्रीचा छंद- जान्हवी हार्मोनियमही वाजवते. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने विविध कार्यक्रमात भाग घ्यायला सुरुवात केली. ती लहानपणापासूनच नृत्य, गायन व मिमिक्री करायची. जान्हवी जेव्हा कोणत्याही स्पर्धेत भाग घेते तेव्हा तिला पहिले पारितोषिक मिळते. जान्हवीने बालदिनानिमित्त हैदराबादच्या रवींद्र भारती येथे आयोजित बालोत्सव 2021 गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत तिला प्रथम पारितोषिक मिळाले. बालोत्सव स्पर्धेत जान्हवीने सलग तिसऱ्या वर्षी पहिले पारितोषिक पटकावले. कार्यक्रमात गाण्यासोबतच तिने मिमिक्रीही केली. ती एनटीआर आणि जुन्या काळातील सुपरस्टार्सच्या आवाजाची आणि संवादांची मिमिक्री करते.
प्रसिद्ध गायिका होण्याचे माझे ध्येय - जान्हवी सांगते, मी मंचेरियलमध्ये इंटरमिजिएटच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. मला गाण्यात रस आहे. माझे आदर्श गायक एसपी बालसुब्रमण्यम आणि चित्रा आहेत. मला या दोन्ही गायकांकडून प्रेरणा मिळाली आहे. अभिनयात एनटीआर हे माझे आदर्श होते. त्यांना चित्रपटांमध्ये पाहून मी अभिनय शिकले. मी वयाच्या चौथ्या वर्षापासून गायन आणि अभिनयाला सुरुवात केली. मी एकूण 17 भाषांमध्ये गात आहे. माझ्या वडिलांच्या पाठिंब्यामुळे मी येथपर्यंत पोहोचले आहे. प्रसिद्ध गायिका होण्याचे माझे ध्येय आहे."
चित्रपटांमध्ये केले काम- जान्हवीची आई सुजाता यांनी जान्हवी उत्तम अभिनेत्री बनेल, अशी आम्हाला आशा वाटते. जान्हवीने वयाच्या सहाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. तिने आणखी दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. जान्हवीने विविध तेलुगू टेलिव्हिजन शोमध्येही तिची प्रतिभा दाखवली आहे. भविष्यात ती अनेक उंची गाठेल, असा विश्वास तिच्या कुटुंबीयांना आहे. अनेक कलागुणांनी समृद्ध असलेल्या या प्रतिभावंत जान्हवीला आपण शुभेच्छा देऊ या!
हेही वाचा-Stampede in Madurai : मदुराई येथील वैगई नदी उत्सवात चेंगराचेंगरी; २ भाविक ठार