हैदराबाद - तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. के. चंद्रशेखर राव यांचा आज (सोमवारी) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार के. चंद्रशेखर राव यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असून त्यांनी स्वत:ला फार्महाऊसमध्ये क्वारंटाईन केले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे, की मागील काही दिवसात ज्यांच्याशी त्यांचा संपर्क आला आहे, त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ला क्वारंटाईन करावे.