ETV Bharat / bharat

Teenage Girl Forced To Consume Acid : धक्कादायक! जुगारास विरोध करणाऱ्या बालिकेला जुगाऱ्यांनी पाजले तेजाब - शाहजहापूर

घराशेजारी जुगार खेळण्यास विरोध केल्यामुळे जुगाऱ्यांनी बालिकेला तेजाब पाजल्याने खळबळ उडाली. ही घटना शाहजहापूरमधील मतानी मोहल्ल्यात बुधवारी घडली. या प्रकरणातील पीडितेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Teenage Girl Forced To Consume Acid
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Feb 16, 2023, 6:41 PM IST

शाहजहापूर : जुगार खेळण्यास विरोध केल्यामुळे जुगाऱ्यांनी बालिकेला मारहाण करुन तेजाब पाजल्याने खळबळ उडाली. ही घटना शाहजहापूर येथील मतानी मोहल्ल्यात घडली आहे. तेजाब पाजल्याने बालिकेची प्रकृती गंभीर झाली असून तिच्यावर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुगार खेळण्यास विरोध केल्यामुळे जुगाऱ्यांनी बालिकेला तेजाब पाजल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

जुगार खेळताना धडकले पोलीस : पीडित तरुणीच्या घराशेजारी असलेला जितेंद्र हा त्याच्या घरात जुगाऱ्यांना जमा करुन जुगार खेळत होता. घरात जुगार खेळण्याची घटना गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे या परिसरातील नागरिक चांगलेच वैतागले होते. बुधवारीही जितेंद्रच्या घरात अनेक जुगारी एकत्र जमून जुगार खेळत होते. त्यावेळी अचानक पोलिसांची गाडी आल्याची माहिती या जुगाऱ्यांना मिळाली. त्यामुळे या जुगाऱ्यांनी मिळेल त्या रस्त्याने धूम ठोकली. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना देणाऱ्याविरोधात जितेंद्र आणि त्याच्या साथिदारांचा चांगलाच राग आला.

पीडितेला मारहाण करुन पाजले तेजाब : बुधवारी जितेंद्रच्या घरात जुगारी जुगार खेळण्यासाठी आले होते. मात्र जुगार खेळताना अचानक पोलिसांनी छापेमारी केल्यामुळे जुगारी पळून गेले. त्यामुळे जितेंद्रचा पारा चांगलाच चढला. त्याने याबाबतची माहिती देण्याऱ्याला चांगलाच धडा शिकवण्याचा चंग बांधला. त्याला त्याच्या शेजाऱ्यावर याबाबतचा संशय आला होता. त्यामुळे त्याने शेजाऱ्याच्या मुलीला जबर मारहाण केली. इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने शेजाऱ्याच्या बालिकेला जबरदस्तीने तेजाब पाजले. त्यामुळे पीडिता गंभीर झाली. गंभीर अवस्थेत पीडितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पीडितेच्या कुटूंबियांनी विरोध केल्याने पाजले तेजाब : जितेंद्रच्या घरी जुगार खेळण्यासाठी आलेल्या जुगाऱ्यावर पोलिसांनी छापेमारी केली. त्यावेळी या जुगाऱ्यांनी पीडितेच्या घरातून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडितेच्या कुटूंबियांनी जुगाऱ्यांना त्यांच्या घरातून पळण्यास विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या जुगाऱ्यांनी शेजाऱ्यांसोबत वाद घातला. यावेळी पीडितेला पकडून जुगाऱ्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नाही, तर त्यांच्याजवळील तेजाब पीडितेला पाजले. तेजाब पाजल्याने पीडित बालिका गंभीर झाली आहे. पीडितेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती सीओ अखंड प्रताप सिंह यांनी दिली आहे.

हेही वाचा - Infiltration Bid Failed In JK : तंगधारमध्ये लष्काराने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न, एका दहशतवाद्याला धाडले यमसदनी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.