ETV Bharat / bharat

Mission T20 World Cup 2022 : ...म्हणून 15व्या खेळाडूशिवाय टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना - क्रिकेटच्या मराठी न्यूज

मिशन टी-20 विश्वचषक 2022 ची ( Mission T20 World Cup 2022 ) सुरुवात 6 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. तत्पुर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला उड्डाण भरली आहे. भारतीय खेळाडू ( Indian cricket team ) इतर संघांपूर्वी ऑस्ट्रेलियाला गेले आहेत, जेणेकरून त्यांना तेथील हवामानाशी जुळवून घेता येईल आणि वेगवान खेळपट्ट्यांवर सराव करता येईल.

Team India
भारतीय संघ
author img

By

Published : Oct 7, 2022, 10:24 AM IST

मुंबई: टी-20 विश्वचषक 2022 ची सुरुवात 6 ऑक्टोबर 2022 रोजी ( Team India T20 World Cup 2022 ) ऑस्ट्रेलियात होणार आहे. त्यासाठी गुरुवारी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाला रवाना ( Indian cricket team leaves for Australia ) झाला आहे. याबाबतची माहिती स्वत: बीसीसीआयने आणि भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करुन दिली आहे. भारतीय खेळाडू इतर संघांपूर्वी ऑस्ट्रेलियाला गेले आहेत, जेणेकरून त्यांना तेथील हवामानाशी जुळवून घेता येईल आणि वेगवान खेळपट्ट्यांवर सराव करता येईल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) जारी केलेल्या छायाचित्रात 14 खेळाडूंसह कोचिंग स्टाफमधील लोक दिसत आहेत. 15व्या खेळाडूशिवाय टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याचे मानले ( Mission T20 World Cup 2022 ) जात आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमी फिट झाल्याच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. मात्र बीसीसीआयकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, प्रशिक्षक आणि कर्णधाराने निश्चितपणे सूचित केले आहे की त्यांच्याकडे 15 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे आणि तोपर्यंत मोहम्मद शमीच्या फिटनेसवर त्यांची नजर असेल आणि त्यापूर्वी 15 वा खेळाडू संघात सामील होईल.

टीम इंडियाचे पर्थला उड्डाण ( Team Indias flight to Perth ) -

ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला भारतीय संघ
ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला भारतीय संघ

भारतीय क्रिकेट संघ प्रथम थेट पर्थला रवाना झाला आहे. टीम इंडिया प्रथम पर्थला पोहोचेल आणि 13 ऑक्टोबरपर्यंत येथे होणाऱ्या तयारी शिबिरात सहभागी होईल. यादरम्यान येथे दोन सराव सामनेही खेळवले जाणार आहेत. या दोन्ही सराव सामन्यांचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केले आहे, जेणेकरून खेळाडूंना येथील वातावरणाशी जुळवून घेण्याची संधी मिळेल. बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही सामने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. हे दोन्ही सामने 10 आणि 12 ऑक्टोबर रोजी होणार आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर खेळाडूंना त्यांच्या फॉर्मची चाचणी घ्यावी लागेल.

याबाबत भारतीय कर्णधार रोहित शर्माने ( Indian captain Rohit Sharma ) म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियात फारसे खेळाडू खेळलेले नाहीत. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आम्ही प्रथम पर्थला जाऊ. 15 सदस्यीय संघातील निम्मा संघ प्रथमच ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. जेव्हा हे खेळाडू पर्थच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर काही सामने खेळतील. तेव्हा त्यांना तेथील परिस्थितीची जाणीव होईल आणि विश्वचषकाच्या सामन्यांपूर्वी ते नव्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकतील.

बुमराहचा पर्याय कोण ( Who is Bumrah replacement ) -

वेगवान गोलंदाजांची आकडेवारी
वेगवान गोलंदाजांची आकडेवारी

भारतीय कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma ) सांगितले की, आम्ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामनेही आयोजित केले आहेत, जिथे आम्हाला चांगली तयारी करण्याची संधी मिळेल. बुमराह संघाबाहेर असूनही आमच्याकडे असा गोलंदाज आहे. ज्याला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे. रोहित शर्माने त्याचे नाव थेट उघड केले नाही, परंतु लोक संकेतांवरून त्या खेळाडूच्या नावाचा अंदाज लावत आहेत.

भारतीय संघ 4 सराव सामने खेळणार ( Indian team will play 4 practice matches ) -

टी-20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ
टी-20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ

विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबरला होणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी, भारतीय संघाला एकूण 4 सराव सामने खेळायचे आहेत, त्यापैकी 2 सामने बीसीसीआयने आयोजित केले आहेत, तर इतर दोन सामने आयसीसीने नियोजित केले आहेत. टीम इंडिया आपले पहिले 2 सराव सामने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे, तर पुढील 2 सराव सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या संघांसोबत खेळले जाणार आहेत. त्यानंतरच्या दोन सराव सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या तयारीची खरी कसोटी लागणार असून, त्यात गोलंदाजी आणि फलंदाजीची ताकद पाहायला मिळणार आहे.

सराव सामन्यांचे वेळापत्रक ( Schedule of Indian team's practice matches ) -

  • भारत वि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया XI: 10 ऑक्टोबर 2022
  • भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया XI: 12 ऑक्टोबर 2022

यानंतर भारतीय संघाला ब्रिस्बेनमध्ये दोन आयसीसी सराव सामनेही खेळायचे आहेत. हे दोन्ही आयसीसी सराव सामने 17 आणि 19 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळले जातील.

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: 17 ऑक्टोबर 2022
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड: 19 ऑक्टोबर 2022

हेही वाचा - Womens Asia Cup 2022, Indw Vs Pakw : आज भारत पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या, केव्हा आणि कुठे पाहता येणार सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.