ETV Bharat / bharat

Karnataka : लग्नाच्या आमिषाने शिक्षकाने ठेवले विद्यार्थिनींशी संबंध.. दुसऱ्याशी लग्न ठरताच 'प्रायव्हेट' फोटो केले व्हायरल.. - लग्न ठरताच प्रायव्हेट फोटो केले व्हायरल

कर्नाटकातील बेळगावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शिक्षकाने विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ( Student Physically Abused By Teacher ) ठेवले. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी मुलीचे लग्न दुसरीकडे ठरवले असता शिक्षकाने लग्न मोडण्यासाठी त्यांच्या खासगी क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल ( teacher shares private pictures of student ) केले. याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकाला मारहाण
शिक्षकाला मारहाण
author img

By

Published : Jun 9, 2022, 1:35 PM IST

Updated : Jun 9, 2022, 2:08 PM IST

बेळगाव ( कर्नाटक ) : कर्नाटक पोलिसांनी विद्यार्थिनीचे लग्न मोडण्याच्या उद्देशाने तिचे खाजगी फोटो शेअर केल्याप्रकरणी ( teacher shares private pictures of student ) एका शिक्षकाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यान्वये (POCSO) गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ४४ वर्षीय शिक्षकाची विद्यार्थिनीशी मैत्री होती. तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण ( Student Physically Abused By Teacher ) केले. आरोपी शिक्षकाने त्यांच्या खासगी क्षणांचे फोटोही काढले होते.

दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत निश्चित केले. तिचे लग्न रोखण्यासाठी आरोपीने मुलीचे खासगी छायाचित्र व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकून ते व्हायरल केले. ही बाब गावकऱ्यांना समजल्यानंतर शाळेतील आरोपी शिक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना खेचून पोलिस ठाण्यात नेले आणि तक्रारही दिली.

हेही वाचा : Mother Murdered: गोळ्या झाडून मुलाने केली आईची हत्या.. दोन दिवस मृतदेह घरात ठेऊन खेळला क्रिकेट..

Last Updated : Jun 9, 2022, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.