ETV Bharat / bharat

तामिळनाडू विधानसभा निवडणूक : द्रमुकच्या मोठ्या नेत्याच्या संपत्तीवर प्राप्तीकर विभागाचे छापे

author img

By

Published : Mar 25, 2021, 5:21 PM IST

वेलूंचे घर, शैक्षणिक संस्था आणि ट्रस्टची छाननी सध्या करण्यात येत आहे. यासोबतच, अरुणाई अभियांत्रिकी महाविद्यालय, कंबन कला व शास्त्र महाविद्यालय, जीवा वेलू इंटरनॅशनल स्कूल आणि तिरुवन्नामलाईमधील वैद्यकीय महाविद्यालयावरही छापा टाकण्यात आला आहे..

Taxmen search premises linked to DMK leader in poll-bound TN
तामिळनाडू विधानसभा निवडणूक : द्रमुकच्या मोठ्या नेत्याच्या संपत्तीवर प्राप्तीकर विभागाचे छापे

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दहा दिवसांपेक्षाही कमी काळ राहिला आहे. यातच द्रमुकचे वरिष्ठ नेते ई.व्ही.वेलू यांच्या संपत्तीवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले आहेत. वेलूंच्या चेन्नईतील घरासह १८ ठिकाणच्या संपत्तीवर हे छापे मारण्यात आले. विरोधक सध्या या कारवाईचा निषेध करत आहेत.

वेलूंचे घर, शैक्षणिक संस्था आणि ट्रस्टची छाननी सध्या करण्यात येत आहे. यासोबतच, अरुणाई अभियांत्रिकी महाविद्यालय, कंबन कला व शास्त्र महाविद्यालय, जीवा वेलू इंटरनॅशनल स्कूल आणि तिरुवन्नामलाईमधील वैद्यकीय महाविद्यालयावरही छापा टाकण्यात आला आहे. तिरुवन्नामलाईमध्ये द्रमुककडून उमेदवार म्हणून वेलू यांचे नाव पुढे करण्यात आले होते. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष स्टॅलिन हे वेलू यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते.

शैक्षणिक संस्थांवर छापेमारी सुरू असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी सहा एप्रिलला मतदान होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा : 'पॉर्न' पाहिल्यामुळे जिवाजी विद्यापीठाच्या आठ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; ग्वाल्हेरमधील प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.