ETV Bharat / bharat

एअर इंडिया खरेदीसाठी आज बोली लावणार टाटा ग्रुप

author img

By

Published : Dec 14, 2020, 1:41 PM IST

एअर इंडिया खरेदीसाठी टाटा ग्रुप आज स्वारस्यनिविदा (खरेदी करण्यात स्वारस्य असण्यासंबधित औपचारिकरित्या दाखल केलेले कागदपत्रे) दाखल करणार आहे. टाटा, अडानी आणि हिंदुजाही बोली लावणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सरकारने मुदतवाढ केली नसून एअर इंडियासाठी बोली लावण्याची आजची शेवटची तारिख आहे.

एअर इंडिया
एअर इंडिया

नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. एअर इंडियाच्या बोलीत टाटा ग्रुपने रस दाखविला आहे. एअर इंडिया खरेदीसाठी टाटा ग्रुप आज स्वारस्यनिविदा (खरेदी करण्यात स्वारस्य असण्यासंबधित औपचारिकरित्या दाखल केलेले कागदपत्रे) दाखल करणार आहे. टाटा, अडानी आणि हिंदुजाही बोली लावणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सरकारने मुदतवाढ केली नसून एअर इंडियासाठी बोली लावण्याची आजची शेवटची तारिख आहे.

टाटा ग्रुपने एअर इंडियाचं मूल्यांकन करण्यास सुरूवात केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत टाटा ग्रुप एअर इंडियासाठी बोली लावेल असं मानलं जात आहे. सरकारने एअर इंडियासाठी बोली लावणाऱ्याकरिता औपचारिक तारिख 5 जानेवरी केली आहे. यापूर्वी ती तारिख 29 डिसेंबर होती. 29 डिसेंबरला शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या बिल्डर्सच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.

2019 मध्ये विक्री करण्याचा प्रयत्न -

केंद्र सरकारने एअर इंडियाची 2019 मध्ये विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. केंद्र सरकारने जानेवारी 2020 पासून एअर इंडियामध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये एअर इंडियामधील 50टक्के हिस्सा विकणे व एअर इंडिया एक्सप्रेसमधील 100 टक्के हिस्सा विकणे आदींचा समावेश आहे.

अनेक कंपन्यांचा एअर इंडियाच्या खरेदीत निरुत्साह -

टाटा ग्रुपला विमान वाहतूक क्षेत्राचा अनुभव आहे. पूर्वी एअर इंडिया सार्वजनिक कंपनी होण्यापूर्वी टाटा ग्रुपच्या मालकीची होती. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे अनेक कंपन्या आर्थिक संकटात आहे. तसेच जगभरातील विमान कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाच्या संकटाने पर्यटन आणि विमान वाहतूक क्षेत्रामुळे मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बहुतेक कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीत निरुत्साह दाखविला आहे.

विदेशी गुंतवणूक कायद्यात सुधारणा -

एअर इंडियावर 31 मार्च 2019 पर्यंत सुमारे 60 हजार 74 कोटी रुपयांचे कर्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने नुकतेच थेट विदेशी गुंतवणूक कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे अनिवासी भारतीयाला एअर इंडियामध्ये 100 टक्के हिस्सा खरेदी करता येवू शकणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात विदेशातील भारतीयांना मायदेशात आणणे, वैद्यकीय उपकरणे व साधने देश-विदेशात पोहोचविणे अशी महत्त्वाची कामे एअर इंडियामुळे सहजशक्य झाली आहेत.

हेही वाचा - वांशिक नरसंहार म्हणजे काय? जगातील वंशहत्येच्या मोठ्या घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.