हैदराबाद (तेलंगणा) : टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेडने मंगळवारी घोषणा केली की, त्यांनी हैदराबादमधील त्यांच्या कार्यस्थळी अत्याधुनिक सुविधेतून बोईंग 737 विमानांसाठी पहिली उभ्या फिनची रचना तयार करून अमेरिकेतील कारखान्यात पाठवली आहे. हे उभे पंखे आता अमेरिकेत असलेल्या बोईंग 737 विमानाच्या कारखान्यात एकत्रीकरणासाठी बोईंग उत्पादन सुविधेकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. TBAL ने 2021 मध्ये विमानांच्या 737 सिरीजसाठी जटिल अशी वर्टिकल फिन स्ट्रक्चर्स तयार करण्यासाठी नवीन उत्पादन लाइनही सुरु केली असल्याचे कंपनीने सांगितले.
पहिलाच उभा पंख : हैदराबाद येथील नवीन उत्पादन प्रकल्पात विमानाच्या साहित्याच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि प्रगत एरोस्पेस संकल्पनांचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये संपूर्ण विमानाचे अमेम्बलिंग केले जाते. बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते म्हणाले की, टाटा बोइंग एरोस्पेस लिमिटेड हे भारतातील एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील एकात्मिक प्रणालींच्या सह-विकासासाठी बोईंगच्या वचनबद्धतेचे आणि देशाच्या आत्मनिर्भर भारत क्षमतांचे प्रतिबिंब आहे. पहिला उभा पंख ज्या गतीने आणि गुणवत्तेने तयार केला गेला आहे तो TBAL च्या कुशल कामगार, अभियांत्रिकी प्रतिभा आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन कौशल्याची साक्ष असल्याचेही गुप्ते यावेळी म्हणाले.
पहिली शिपमेंट यशस्वी : Tata Advanced Systems Limited (TASL) चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO सुकरण सिंग म्हणाले, बोईंग 737 विमानासाठी पहिल्या उभ्या फिन स्ट्रक्चरची यशस्वी शिपमेंट हे TBAL मधील टीमच्या कठोर परिश्रमाचे आणि अखंड सहकार्याचे परिणाम आहे. यामुळे TBAL आणि भारताला एकूण बोईंग विमानाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा उत्पादन आधार म्हणून असल्याचे दाखवत आहे. गुणवत्ता आणि वेळेवर वितरणावर भर देऊन स्वदेशी एरोस्पेस उत्पादनाच्या प्रगतीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
९०० हुन अधिक अभियंते, तंत्रज्ञ कार्यरत : 14,000 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या संयुक्त उपक्रमात बोईंग आणि TASL मधील 900 हून अधिक अभियंते आणि तंत्रज्ञ कार्यरत आहेत. याठिकाणी जगभरातील ग्राहकांसाठी बोईंगच्या AH-64 अपाचे हेलिकॉप्टरसाठी एरो-स्ट्रक्चर्स तयार करण्यात येत आहे. ज्यामध्ये फ्यूसेलेज, दुय्यम संरचना आणि उभ्या स्पार बॉक्सचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, TBAL ने भारतीय सैन्याच्या ऑर्डरनुसार सहा AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरपैकी पहिले फ्यूजलेज देखील वितरित केले. विमानासाठी उभे पंखे तयार करण्यात आल्याने भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.