तिरुवल्लूर (तामिळनाडू) : सुंदरीबाई या तामिळनाडूच्या आवाडी कामराज शहरात राहत होत्या. त्यांची आई, वडील आणि भावंडं एकामागून एक कॅन्सरने मरण पावले. दरम्यान, 17 फेब्रुवारीला सुंदरीबाईंचाही मृत्यू झाला. पण मृत्यूपूर्वी त्यांनी एक पत्र लिहिलं होते, जे आता समोर आले आहे.
काय आहे पत्रात? : आपल्या पत्रात सुंदरीबाई यांनी म्हटले आहे की, 'मी माझे घर, 54 सोन्याचे दागिने आणि बँक खात्यातील 61 लाख रुपये कांचीपुरम येथील अण्णा कॅन्सर सेंटरला सुपूर्द करण्याची विनंती करते आहे. या बरोबरच माझे घर व ऑटो चालकाचे थकीत पैसे बाकी आहेत, ते भरण्याचीही मी विनंती करते. तसेच मी माझ्या घरात पाळलेल्या 10 पेक्षा जास्त मांजरींचे संरक्षण करण्याची देखील विनंती करते'.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार : यानंतर आवाडी पोलिस सहाय्यक निरीक्षक प्रेमा आणि आवडी विलिंचिअंबक्कम ग्राम प्रशासकीय अधिकारी अल्फोन्सा यांनी पत्रात नमूद केलेल्या या सर्व वस्तू जप्त केल्या. यानंतर सुंदरीबाई राहत असलेल्या घरालाही कुलूप लावून सील करण्यात आले. त्यानंतर 18 मार्च रोजी पोलिसांनी सुंदरीबाईंच्या मालमत्तेची कागदपत्रे, 54 सोन्याचे दागिने, 5 हजार रुपये रोख, बँक खाती आणि पोस्ट ऑफिसमधील 60 लाख रुपये, आधारकार्ड आणि रेशनकार्ड आवाडी पोलिसांच्या महसूल अधिकाऱ्यांना सुपूर्द केले. सुपूर्द केलेल्या सर्व वस्तू आणि कागदपत्रे उपजिल्हाधिकारी, आवाडी यांनी सत्यापित केली आणि सर्व वस्तू सीलबंद करून सुरक्षितपणे तिरुवल्लूर कोषागार कार्यालयाकडे सुपूर्द केल्या गेल्या आहेत.
विजेचा धक्का लागून तीन हत्तींचा मृत्यू : तामिळनाडूतील धर्मापुरी जिल्ह्यात विजेचा धक्का लागून तीन हत्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात विजेचा प्रवाह असलेल्या कुंपणाचा धक्का लागल्याने ही घटना घडली. या प्रकरणी वनविभागाच्या तक्रारीवरून या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून धर्मापुरी जिल्हा पोलिसांनी आरोपी शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा : Kiran Patel Fake PMO Officer : गुजरातच्या व्यक्तीचा असाही प्रताप! बनावट पीएमओ अधिकारी बनून घेतली झेड प्लस सुरक्षा!