ETV Bharat / bharat

कमल हासनचा पक्ष लढवणार विधानसभा निवडणूक; १५४ जागा निश्चित..

कूण २३४ मतदारसंघांपैकी १५४ मतदारसंघांमधून एमकेएम निवडणूक लढवणार आहे. या युतीमधील बाकी दोन पक्ष ऑल इंडिया समथुवा मक्कल काटची (एआयएसएमके) आणि इंधिया जननायक काटची (आयजेके) हे प्रत्येकी ४० जागांवर निवडणूक लढवणार आहेत.

Tamil Nadu polls: Kamal Haasan's MNM finalises seat-sharing deal, to contest 154 seats
कमल हासनचा पक्ष लढवणार विधानसभा निवडणूक; १५४ जागा निश्चित..
author img

By

Published : Mar 9, 2021, 5:32 PM IST

नवी दिल्ली : अभिनेता कमल हासनचा राजकीय पक्ष मक्कल नीधी मैयम (एमकेएम) आपल्या दोन साथीदार पक्षांसह तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवणार आहे. एकूण २३४ मतदारसंघांपैकी १५४ मतदारसंघांमधून एमकेएम निवडणूक लढवणार आहे. या युतीमधील बाकी दोन पक्ष ऑल इंडिया समथुवा मक्कल काटची (एआयएसएमके) आणि इंधिया जननायक काटची (आयजेके) हे प्रत्येकी ४० जागांवर निवडणूक लढवणार आहेत.

डीएमडीकेला युतीमध्ये येण्याचे आमंत्रण..

दरम्यान, विजयकांत यांच्या देसीय मुर्पोक्कू द्रविड काळगम (डीएमडीके) यांनी एआयएडीएमके युतीमधून बाहेर पडल्याची घोषणा आज केली. जागावाटपावरुन असमाधानी असल्यामुळे विजयकांत यांनी हा निर्णय घेतला, यानंतर कमल हासन यांनी डीएमडीकेला एमएनएम युतीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले आहे.

तामिळनाडूमध्ये सहा एप्रिलला निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर दोन मे रोजी मतमोजणी पार पडेल. यासाठी काँग्रेस-डीएमके आणि भाजप-एडीएमके यांमध्ये मुख्य लढत असणार आहे.

हेही वाचा : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.