चेन्नई : तामिळनाडूमध्ये मुलगी म्हणून जन्मलेली आणि हार्मोन बदलांमुळे पुरुष बनलेली सुबिक्षा आणि बांगलादेशातील टीना दास यांचे पारंपरिक पद्धतीने लग्न Transgender Marriage झाले. चेन्नईत हा विवाह चर्चेचा विषय बनला होता.
कॅनडामध्ये प्रेमाची चाहूल लागली - तामिळनाडू येथील सुभिक्षा सुब्रमणि (२९) ही जन्माने स्त्री होती. वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या शरीरात झालेल्या बदलांमुळे आपण पुरुष आहोत हे तिला जाणवू लागले. ती सध्या कॅलगरी, कॅनडा येथे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे. तसेच टीना दास (39) ही बांगलादेशी हिंदू कुटुंबातील महिला आहे. 4 वर्षे पतीसोबत राहिल्यानंतर तिला समजले की ती लेस्बियन आहे. त्यामुळे तिने पतीला सोडले. ती कॅलगरी येथील हॉस्पिटलमध्ये केअरगिव्हर म्हणूनही काम करते. मोबाईल अॅपच्या मदतीने दोघांची मैत्री झाली आहे. अखेरीस दोघे प्रेमात पडले आणि 31 ऑगस्ट रोजी चेन्नईमध्ये लग्न केले.
मदुराईमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या सुबिक्षा सुब्रमणि काही काळ कतारमध्ये राहिल्या. त्यानंतर ती कॅनडामध्ये स्थलांतरित झाली. सुबिक्षाने तिच्या शरीरात झालेल्या बदलाबाबत आईला सांगितले होते. आईने तिला धीर दिला की, काही काळाने सर्वकाही ठिक होईल. एका क्षणी, सुबिक्षा आणि टीनाने घरात घोषणा केली की, त्या लग्न करणार आहेत. सुरुवातीला या निर्णयावर आक्षेप घेतलेल्या पालकांनी काही महिन्यांनी होकार दिला. त्यानुसार हा विवाह पार पडला.
चेन्नईतील पारंपारिक विवाह झाल्यावर सुविक्षा म्हणाली, "माझा जन्म मदुराईमध्ये झाला. मी कतारमध्ये वाढले. मला वयाच्या 19 व्या वर्षी एक पुरुष असल्यासारखे वाटले. त्यानंतर मी कॅनडाला गेले. माझे आई-वडील सुरुवातीला माझ्या शरीरात झालेला बदल स्वीकारू शकले नाहीत. त्यांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांना समजले." सुबिकाची आई पूर्णा पुष्कला म्हणाली, "सुबिकाच्या शरीरात झालेला बदल ऐकून मला धक्काच बसला. समाजात सुबिक्षा कशी जगेल याचीही मला भीती वाटत होती. आणि तिच्या वैवाहिक जीवनाचे काय होईल. त्याच वेळी मला वाटले की माझ्या मुलीचे सुख महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी या लग्नाला संमती दिली आहे.
टीना आणि सुविक्षा यांनी दोन्ही कुटुंबांच्या सांक्षीने लग्न केले. बांगलादेशातील टीना दास यांनी सांगितले की, "माझा जन्म बांगलादेशातील मौलीबाजार येथे झाला. मला लहानपणापासूनच महिलांबद्दल आकर्षण होते. माझ्या आई-वडिलांना हे कळले. त्यांनी मला समजावले. वयाच्या १९ व्या वर्षी माझे लग्न झाले होते. पण, मला त्याच्यासोबत राहायचे नव्हते आणि 4 वर्षात त्याच्याशी संबंध तोडले. यामुळे माझी बहीण मला सोडून गेली. कुटुंबानेही संपर्क तोडला. मग मी सुबिक्षाला कॅनडामध्ये भेटले. कॅनडामध्ये लग्नाची नोंदणी करणारे हे जोडपे आता कॅलगरीला परतण्यापूर्वी आग्नेय आशियाचा प्रवास करणार आहेत. चेन्नईमध्ये अशी घटना घडल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा आपल्या स्टाईलने भुरळ घालणाऱ्या 'ट्रान्स' सौंदर्यवती : 'आम्ही आहोत' ट्रान्स मॉडेल्स