ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीर : फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन - Syed Ali Shah Geelani news

फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे बुधवारी रात्री 10.35 च्या दरम्यान श्रीनगरच्या हैदरपोरा येथील निवासस्थानी निधन झाले.

Syed Ali Shah Geelani
Syed Ali Shah Geelani
author img

By

Published : Sep 2, 2021, 12:27 AM IST

हैदराबाद - काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे बुधवारी रात्री 10.35 च्या दरम्यान श्रीनगरच्या हैदरपोरा येथील निवासस्थानी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती.

कोण आहेत सय्यद अली शाह गिलानी?

सय्यद अली शाह गिलानी यांचा जन्म 29 सप्टेंबर 1929 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झाला होता. सुरूवातील ते जमात-ए-इस्लामी या संघटनेचे सदस्य होते. नंतर त्यांनी तेहरिक-ए-हुर्रियतची स्थापना केली. तसेच त्यांनी ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते 1972, 1977 आणि 1987 मध्ये जम्मू -काश्मीरच्या सोपोर मतदारसंघातून आमदार निवडून आले होते. तर जून 2020मध्ये त्यांनी हुरियतशी संबंध तोडले.

मेहबूबा मुफ्ती यांनी केले ट्वीट -

दरम्यान, जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवर सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

  • Saddened by the news of Geelani sahab’s passing away. We may not have agreed on most things but I respect him for his steadfastness & standing by his beliefs. May Allah Ta’aala grant him jannat & condolences to his family & well wishers.

    — Mehbooba Mufti (@MehboobaMufti) September 1, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.