ETV Bharat / bharat

Swami Vivekananda Jayanti 2023 : स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील 'त्या' 10 गोष्टी जगण्याची देतात प्रेरणा - रामकृष्ण मिशन

१२ जानेवारी १८६३ रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म, (Swami Vivekananda Jayanti 2023) कलकत्ता येथील एका बंगाली कायस्थ कुटुंबात झाला. विवेकानंदांना भारतातील देशभक्त संन्यासी मानले जाते आणि त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा (National Youth Day 10) केला जातो. आयुष्याची दिशा बदलवून टाकणारे अनमोल (precious thoughts to inspire life) विचार, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण जाणुन घेऊया. (Founder of Ramakrishna Mission)

Swami Vivekananda Jayanti 2023
राष्ट्रीय युवा दिन
author img

By

Published : Dec 23, 2022, 1:36 PM IST

Updated : Jan 12, 2023, 7:09 AM IST

स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. कलकत्ता येथील एका बंगाली कायस्थ कुटुंबात जन्मलेले विवेकानंद हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. ते त्यांचे गुरू रामकृष्ण देव यांच्या प्रभावाने खूप प्रभावित झाले होते. रामकृष्णांच्या मृत्यूनंतर, विवेकानंदांनी भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आणि ब्रिटिश भारतातील तत्कालीन परिस्थितीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवले. ते वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक शिक्षक होते. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. 1893 मध्ये अमेरिकेत शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म महासभेत त्यांनी भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले. स्वामी विवेकानंदांच्या भाषणामुळेच भारताचे अध्यात्माने भरलेले वेदांत तत्त्वज्ञान अमेरिका आणि युरोपमधील प्रत्येक देशात पोहोचले. त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती, जी अजूनही कार्यरत आहे. विवेकानंदांना भारतातील देशभक्त संन्यासी मानले जाते आणि त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रवादाची भावना जागृत आपल्या देशात असे अनेक महापुरुष झाले आहेत, ज्यांच्या जीवनातून आणि विचारातून प्रेरणा घेऊन आपण खूप काही शिकू शकतो. त्यांचे विचार असे आहेत की, निराश झालेल्या व्यक्तीलाही जीवन जगण्याचा नवा हेतू प्राप्त होऊ शकतो. स्वामी विवेकानंद हे त्यापैकीच एक. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. त्यांनी रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन आणि वेदांत सोसायटीची पायाभरणी केली. ते हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि वसाहतवादी भारतात राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी ओळखले जातात. स्वामी विवेकानंदांचे असे अमूल्य विचार, जे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात...

असे बदला तुमचे जीवन 1. अभ्यासासाठी एकाग्रता आवश्यक आहे, एकाग्रतेसाठी ध्यान आवश्यक आहे. केवळ ध्यानाद्वारे आपण इंद्रियांवर नियंत्रण ठेवून एकाग्रता साधू शकतो. 2. ज्ञान हे स्वतःमध्ये असते, माणूस फक्त त्याचा शोध लावतो. 3. उठा आणि जागे व्हा आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करत नाही तोपर्यंत थांबू नका. 4. जगण्यापर्यंत शिका, अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे. 5. शुद्धता, संयम आणि उपक्रम - मनुष्यात हे तीन गुण एकत्र हवे पाहीजे असते. 6. आयुष्यात कितीही बिकट पिरस्थिती आली तरी, तुम्ही कधीही न्यायाच्या मार्गापासून दूर जाऊ नका. 7. ज्या कामासाठी तुम्ही वचन द्याल, ते काम त्याच वेळी केले पाहिजे, अन्यथा लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. 8. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावर विश्वास ठेवू शकत नाही. 9. एका वेळी एक गोष्ट करा आणि ते करताना तुमचा संपूर्ण आत्मा त्यात टाका आणि बाकी सर्व विसरून जा. 10. जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय होईल.

Last Updated : Jan 12, 2023, 7:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.