ETV Bharat / bharat

नंदीग्रामला 'आऊटसाईडर' नाही, तर त्यांचा मुलगा हवा, सुवेंदू अधिकारी यांची दीदींवर टीका

author img

By

Published : Mar 6, 2021, 7:58 AM IST

राज्याच्या मुख्यमंत्री ममता ब‌ॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावर भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी दीदींचा 'आऊटसाईडर' असा उल्लेख केला.

पश्चिम बंगाल विधानसभा
पश्चिम बंगाल विधानसभा

मीदनापूर (पश्चिम बंगाल) - राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. सत्तेत येण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता ब‌ॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावर भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी दीदींचा 'आऊटसाईडर' असा उल्लेख केला. नंदीग्राम हा मतदारसंघ ममतांची तृणमूल काँग्रेस सोडून भाजपाचा हात धरलेल्या सुवेंदू अधिकारी यांचा आहे. मतदाससंघात त्यांचे चांगलेच वर्चस्व आहे. त्यामुळे दोघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे.

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसने (एआयटीसी) आपल्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली. त्यानुसार नंदीग्राममधून ममता निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. नंदीग्राममधून त्या निवडणूक लढत आहेत, त्यांचे मतदारसंघात स्वागतच आहे. मात्र, मतदारसंघातील लोकांना कोणी 'आऊटसाईडर' नाही. तर त्यांचा मुलगा हवा आहे, असे ते म्हणाले. आता रणांगणात तुमचा सामना केला जाईल. तुम्हाला पराभूत होऊनच नंदीग्राम सोडावे लागेल, असे ते म्हणाले.

ममता बॅनर्जी नंदीग्राममधून लढणार निवडणूक -

ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी 291 मतदारसंघांमधील उमेदवारांची नावे जाहीर केली. यांमध्ये 50 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. तसेच, यंदा त्या स्वतः भवानीपूरमधून नाही. तर नंदीग्राममधून निवडणूक लढवणार आहेत. भवानीपूरमधून दीदी गेल्या 11 वर्षांपासून सलग लढत आल्या आहेत.

ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी भिडणार -

बंगालच्या राजकारणात दबदबा असलेल्या सुवेंदू अधिकारी भाजपात सहभागी झाल्याने भाजपाला त्यामुळे अधिकच बळ मिळालं आहे. तृणमूलमधून त्यांनी हळूच काढता पाय घेतला. प्रथम त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 16 डिसेंबरला त्यांनी आमदारिकीचा राजीनामा दिला. तर लागलीच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत, तृणमूलला रामराम ठोकला. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणुकीमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून नंदीग्राममधून मोठ्या फरकानं विजय मिळवला होता. त्यांना 87 टक्के मतं मिळाली होती. त्यांनी सीपीआय उमेदवार अब्दुल कबीर यांना 81,230 मतांच्या फरकानं पछाडलं होतं. अद्याप भाजपाकडून त्यांच्या उमेदावारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. तर यंदाही सुवेंदू अधिकारी हे नंदीग्राममधून लढले. तर ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.

राज्यात 8 टप्प्यात मतदान -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल. तर 2 मेला निकाल जाहीर होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.