कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाने सुवेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवलं आहे. शनिवारी सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपल्याकडे 80 लाखांपेक्षा अधिक संपत्ती असल्याची घोषणा केली आहे.
निवडणूक आयोगाला त्यांच्याकडून देण्यात आलेल्या वचनपत्रानुसार, त्यांच्याजवळ 80,66,749.32 रुपयांची संपत्ती आहे. यात त्यांच्याकडे 59,31,647.32 रुपये एवढी जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये 46,15,513.32 रुपये आहेत. तसेच निवडणूक खर्च खात्यामध्ये 41,823 रुपये आहेत. त्यांच्या विरोधात काही गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी मान्य केलंय.
2019-20 मध्ये सुवेंदु अधिकारी यांचे उत्पन्न 11,15,715.00 रुपये होते. तर सध्या त्यांच्याकडे 50 हजार रुपये रोख आहेत. तसेच त्यांच्याकडे 5,45,000 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र जमाराशी आहे. तर 7,71,165 रुपयांचा विमा आहे. सुवेंदु अधिकारी यांच्याकडे जमिनीसह 46,21,102 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सुवेंदु अधिकारी यांच्याकडे जमिनीसह 46,21,102 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नंद्रीग्राम विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 1 एप्रिलला मतदा होणार आहे. ममता दीदी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होईल.
- पहिला टप्पा - 27 मार्च
- दुसरा टप्पा - 1 एप्रिल
- तिसरा टप्पा - 6 एप्रिल
- चौथा टप्पा मतदान - 10 एप्रिलला
- पाचवा टप्पा मतदान - 17 एप्रिल
- सहावा टप्पा मतदान - 22 एप्रिल
- सातवा टप्पा मतदान - 26 एप्रिलला
- आठवा टप्पा मतदान - 29 एप्रिलला पार पडेल